संसदेत कंगना राणौतचा साधा साडी लूक; पण चर्चेत राहिल्या 56 लाखांच्या लक्झरी अ‍ॅक्सेसरीज!

संसदेत कंगना राणौतचा साधा साडी लूक चर्चेत; 35 लाखांची हर्मेस बर्किन बॅग आणि 21 लाखांच्या रोलेक्स घड्याळासह लक्झरी अ‍ॅक्सेसरीजने वेधलं लक्ष.

Kangana Ranaut luxury parliament Look

Kangana Ranaut luxury parliament Look : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) संसदेतील अलीकडील लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पावसाळ्याच्या दिवसात संसदेत पोहोचताना कंगनाने फिकट निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तिचा लूक साधा आणि पारंपरिक वाटत असला, तरी त्यासोबत वापरलेल्या महागड्या लक्झरी अ‍ॅक्सेसरीजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिळालेल्या माहितीनुसार कंगनाच्या या लूकमधील लक्झरी अ‍ॅक्सेसरीजची किंमत अंदाजे 56 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

… तोपर्यंत पंतप्रधान मोदींना रात्रीची झोप लागू देणार नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

फिकट निळ्या साडीत कंगनाचा साधा अंदाज

कंगनाने एरी सिल्कपासून तयार केलेली फिकट निळ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीसोबत तिने पांढऱ्या रंगाचा साधा, अर्ध्या बाह्यांचा ब्लाउज परिधान केला होता. कंगनाने या लूकमध्ये जड दागिने किंवा अतिशय भडक स्टायलिंगचा वापर केलेला नव्हता. साडीची नेसण्याची पद्धतही साधी ठेवण्यात आली होती. त्यामुळे तिचा संपूर्ण लूक पारंपरिक आणि एलिगंट दिसत होता. मात्र, या साध्या लूकमध्ये तिच्या हातातील काळ्या रंगाची हर्मेस बर्किन बॅग, हातातील रोलेक्स घड्याळ आणि छत्री विशेष आकर्षण ठरली.

उत्तर प्रदेशातील महिलांना मिळणार 50 हजारांची मदत? योगी सरकारचा मोठा प्रस्ताव चर्चेत

35 लाखांची हर्मेस बर्किन बॅग

कंगनाच्या हातातील काळ्या रंगाची हर्मेस बर्किन (Hermès Birkin) बॅग सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. ही बॅग टोगो लेदरपासून बनवलेली असल्याचे सांगितले जाते. या बॅगची किंमत अंदाजे 35 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. बॅगला असलेले खास टॉप हँडल आणि सोनेरी रंगाचे हार्डवेअर तिच्या लूकला लक्झरी आणि ग्लॅमरस टच देत होते. कंगनाच्या फिकट निळ्या साडीवर काळ्या रंगाची ही बॅग उठून दिसत होती.

21 लाखांचे रोलेक्स घड्याळ

बॅगसोबत कंगनाच्या हातातील रोलेक्स (Rolex Lady-Datejust) घड्याळानेही लक्ष वेधून घेतले. चॉकलेट-ब्राऊन रंगाचा डायल असलेल्या या घड्याळाची किंमत अंदाजे 21 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना शिर्डी पोलीस ठाण्यात हजर ; शेतकऱ्याच्या फसवणुकीप्रकरणी नोंदवला जबाब

हर्मेस बर्किन बॅग आणि रोलेक्स घड्याळाची अंदाजे किंमत एकत्र केली तर ती सुमारे 56 लाख रुपये होते. त्यामुळे कंगनाचा साधा साडी लूक असूनही तिच्या लक्झरी अ‍ॅक्सेसरीजची चर्चा अधिक झाली.

6,100 रुपयांची छत्रीही चर्चेत

कंगनाच्या या लूकमध्ये तिची छत्रीही विशेष ठरली. दिल्लीतील पावसापासून बचाव करण्यासाठी तिने गुड अर्थ (Good Earth) ब्रँडची प्रिंटेड छत्री वापरली होती. या छत्रीची किंमत अंदाजे 6,100 रुपये असल्याचे सांगितले जाते. फिकट निळसर-हिरव्या रंगाच्या या छत्रीवर ट्रॉपिकल स्टाइल प्रिंट होती. छत्रीच्या आतील बाजूस ग्राफिक शेवरॉन पॅटर्न असून, त्याला लाकडी हँडल देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, छत्रीचा रंग कंगनाच्या साडीशीही चांगलाच जुळत होता.

Australia vs Bangladesh 1st Test: बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर कांगारुंनी नांग्या टाकल्या;198 धावांवर रोखले !

साधेपणा आणि लक्झरीचा परफेक्ट मेळ

कंगनाच्या या लूकमध्ये एकीकडे एरी सिल्कची साधी फिकट निळी साडी आणि पांढरा ब्लाउज होता, तर दुसरीकडे लाखो रुपयांची हर्मेस बर्किन बॅग आणि रोलेक्स घड्याळ होते. त्यामुळे तिच्या पारंपरिक भारतीय लूकमध्ये लक्झरी फॅशनचा वेगळा टच पाहायला मिळाला. संसदेत पोहोचतानाचा कंगनाचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरण्यामागे तिच्या साध्या साडीपेक्षा महागड्या अ‍ॅक्सेसरीजची निवड अधिक महत्त्वाची ठरली आहे. तिच्या लूकमधील बॅग, घड्याळ आणि अगदी छत्रीपर्यंत प्रत्येक गोष्ट चर्चेत आली आहे.

follow us