मंत्री मला ओळखत नसतील, पण मी सर्व सामान्य शिक्षकांचा प्रतिनिधी, सचिन सानपांचं भाजपला प्रत्युत्तर
Sachin Sanap’s Answer BJP पुणे शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन नवनाथ सानप यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले
Minister may not know me, but I am representative of all ordinary teachers Sachin Sanap’s Answer BJP : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन नवनाथ सानप यांनी भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सांगितले की, “मी सर्वसामान्य शिक्षक आहे. त्यामुळे मंत्री मला ओळखत नसतील, पण ज्यांच्या प्रश्नांसाठी मी लढत आहे ते हजारो शिक्षक मला ओळखतात.”
गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट ! मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफ पिछाडीवर
ते पुढे म्हणाले की, शिक्षकांचे खरे प्रतिनिधित्व करण्यासाठीच आपण निवडणूक लढवत असून शिक्षक मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक आपण निश्चितपणे जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Stock Market Crash : शेअर बाजारात 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान; आज शेअर बाजार का कोसळला?
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रश्न केल्यास भाजपला शिक्षक उमेदवार न मिळाल्याने संस्थाचालकाला उमेदवारी देण्यात आली, अशी टीका करत सानप यांनी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी विधाने टाळावीत, असे आवाहन केले.
गोकुळच्या मतपेटीतून मतदाराचा संताप! ‘तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?’
यावेळीही शिक्षकच निर्णय घेतील,” असे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी विधान परिषदेत प्रभावी आवाज बनण्याचा निर्धारही सचिन सानप यांनी यावेळी व्यक्त केला.