मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख जाहीर

पूर्व परीक्षा पुढ ढकलण्यात आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्वच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 08T153420.987

निवडणुकांच्या निकालामुळे स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढ ढकलण्यात आली आहे. 21 डिसेंबर रोजीची एमपीएससी पूर्व परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहे. (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्वच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, नव्याने परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. (Election) आता 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026 रोजी परीक्षा होणार आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायती निवडणुकीच्या मतमोजणीमुळे हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अनुक्रमे 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलं आहे, अशी माहिती आयोगाने दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025च्या परीक्षेचे आयोजन 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 111 ते 12 या वेळेत करण्यात आले होते.

उच्च जातीचं नाव काय?, शिष्यवृत्ती परीक्षेतील जातीयवादी प्रश्नानं संतापाची लाट; संस्थेवर कारवाईची मागणी

दरम्यान, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका 2024 कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या 2 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित केलं आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच 21 डिसेंबर 2025 रोजी असल्याने त्यासंदर्भात काही मुद्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली होती. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेली माहिती आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपरोक्तप्रमाणे जिल्हाधिकारी यांचेकडून मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने, काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेवून त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असं कळवलं आहे.

 

 

Tags

follow us