ब्रेकिंग : एका अविस्मरणीय पर्वाची सांगता; कॅप्टन कुल धोनीची आयपीएलमधून निवृत्ती

MS Dhoni retires from IPL इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्सला एक महत्त्वाचा संघ बनवणारा एम.एस. धोनी आता खेळाडू म्हणून पिवळ्या जर्सीत मैदानात उतरणार नाही.

  • Ninad K
  • Written By: Published:
Letsupp Image (30)

MS Dhoni retires from IPL : चेन्नई सुपर किंग्जला (CSK) आयपीएलमधील सर्वात यशस्वी आणि ओळख देणाऱ्या संघांमध्ये स्थान मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने अखेर आपल्या आयपीएल खेळण्याच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. जवळपास दोन दशके पिवळ्या जर्सीत मैदानावर राज्य गाजवणारा ‘थाला’ आता खेळाडू म्हणून नव्हे, तर आयपीएल २०२७ (IPL 2027) च्या हंगामापासून ‘टीम मेंटॉर’ म्हणून नवी इनिंग सुरू करणार आहे.

आयपीएल २०२७ साठी खेळाडूंना रिटेन (कायम) करण्याच्या अंतिम दिवशी (१७ नोव्हेंबर) सीएसके फ्रँचायझीने या मोठ्या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. काही आठवड्यांपूर्वीच झहीर खानची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर आता धोनीच्या मेंटॉर होण्याने चेन्नईच्या डगआऊटला नवी ताकद मिळाली आहे. या निर्णयामुळे सीएसकेच्या पर्समध्ये ४ कोटी रुपये वाचणार आहेत.

धोनीची आयपीएलमधील ऐतिहासिक आकडेवारी 

२००८ मधील पहिल्या आयपीएल हंगामापासून धोनी हा चेन्नईच्या ओळखीचा केंद्रबिंदू राहिला आहे. यष्टीमागे चपळाईने केलेले स्टम्पिंग, सामन्याचे पारडे फिरवणारी फलंदाजी आणि शांत डोक्याने घेतलेले निर्णय या गोष्टी आता चाहत्यांच्या आठवणीत राहतील.

– ७८ सामन्यांमध्ये ३८.३० च्या सरासरीने आणि १३७.४५ च्या स्ट्राईक रेटने ५,४३९ धावा (२४ अर्धशतके, २६४ षटकार आणि ३७५ चौकार).

– सीएसकेसाठी योगदान: चेन्नईकडून २७२ सामन्यांत ५,३१४ धावा, संघासाठी सर्वाधिक सामने खेळणारा आणि दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज.

– विजेतेपदांचा विक्रम: कर्णधार म्हणून सीएसकेला ५ आयपीएल विजेतेपदे (२०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३) आणि २ चॅम्पियन्स लीग टी-२० (२०१०, २०१४) विजेतेपदे मिळवून दिली. त्याच्या नेतृत्वात संघाने तब्बल १० वेळा आयपीएलची अंतिम फेरी गाठली.

 

OFFICIAL ANNOUNCEMENT 🦁💛

follow us