मोठी बातमी! लोकप्रिय गायक अरिजीत सिंह यांची मोठी घोषणा, घेतला ‘हा’ निर्णय
भारतीय संगीत विश्वातील सध्याच्या घडीचे आघाडीचे गायक अरिजीत सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
आपल्या आवाजाने प्रत्येक हृदयावर राज्य करणारे लोकप्रिय (Music) गायक अरिजीत सिंह यांनी संगीत क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. अरिजीत यांनी सोशल मीडिया हँडल (X) द्वारे ही धक्कादायक बातमी दिली आहे. अरिजीत यांनी स्पष्ट केलं की, ते आता कोणत्याही नव्या चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करणार नाही. परंतु, संगीताची दुनिया आपण सोडणार नाही असेही त्याने नमूद केलं आहे.
जादुई आवाजाची देणगी लाभलेला बॉलीवूडचा तरुण गायक अरिजीत याने आपल्या कोट्यवधी चाहत्यांना आश्चर्यचकीत करणारा धक्कादायक निर्णय घेतला आहे. अरिजीत याने ट्वीटर ( एक्स ) वर पोस्ट करताना लिहीलंय की, ‘सर्वांना नव्या वर्षांच्या शुभेच्छा. इतकी वर्षे एक श्रोत्यांच्या रुपात मला एवढे प्रेम देण्यासाठी मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊ इच्छीतो. मी हे घोषणा करताना आनंदीत आहे की मी आता प्लेबॅक सिंगर म्हणून कोणतीही नवीन असाईनमेंट घेणार नाही. मी हे येथेच थांबवत आहे.
अॅटलीसाठी दीपिका पादुकोण‘लकी चार्म’; AA22XA6 मध्ये दिसणार नवा अवतार
हा प्रवास खूपच शानदार राहिला आणि ईश्वर माझ्यावर खूप मेहरबान राहिला आहे. त्याने स्वत: ‘एक छोटा कलाकार’ कलाकार म्हणत भविष्यात आपण संगीत आणखी जवळून शिकू इच्छीत आहे. चाहत्यांना एक दिलासा आहे की अरिजीत सिंह संगीताच्या या दुनियेत चाहत्यांना भेटत राहतील. त्याने स्पष्ट केले आहे की प्रोजेक्ट्स आणि स्वतंत्र संगीत ( इंडिपेंडेंट म्युझिक ) वर काम सुरू ठेवणार आहे.
अरिजीत याने हे देखील स्पष्ट केलं आहे की त्यांच्या जवळ काही प्रोजेक्ट आधीपासूनच पाईपलाईनमध्ये आहे. त्यांना आपण पूर्ण करणार आहोत. त्यामुळे या वर्षी त्यांची काही गाणी चाहत्यांना ऐकायला मिळतील. दरम्यान, अरिजीत सिंग याचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. ज्याचे टायटल आहे ‘मातृभूमी’. हे गाणं सलमान खान याच्या अपकमिंग चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ चे आहे. हे गाणे अरिजीत सिंह आणि श्रेया घोषाल सोबत मिळून गायलं आहे. म्युझिक हिमेश रेशमिया याने दिलं आहे. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
