पुण्यात व्यापाऱ्यांचा इशारा अन् महापालिका नमली! लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाईला अखेर ब्रेक
Pune Anti-Encroachment Drive : पुण्यात अतिक्रमणांविरोधात मनपा दररोज कारवाई करणार, दबाव आणणाऱ्यांना मोठा इशारा.
Pune Anti-Encroachment Drive : पुणे शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, आता डिसेंबर महिन्यातही दररोज अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे. (Pune) फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अतिक्रमणांचा मुद्दा भाजप नगरसेवकांनी आंदोलनाद्वारे उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने FC रोड आणि JM रोडवर कारवाई केली. मात्र, आता ही मोहीम केवळ प्रमुख रस्त्यांपुरती मर्यादित न ठेवता शहरातील सर्व भागांत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारवाईत कोणताही खंड पडणार नाही, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला असून, दुकानांसमोरील जागांवरही मोठ्या प्रमाणात अनधिकृत कब्जे करण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. पुण्यातील सुमारे 2.5 लाख दुकानांनी फ्रंट मार्जिनच्या जागेचा व्यावसायिक वापर केल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यामुळे यापुढे केवळ फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून प्रशासन थांबणार नाही, तर दुकानांसमोरील फ्रंट मार्जिनमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवरही कारवाई केली जाणार आहे. या जागेवर एक इंचही अनधिकृत बांधकाम सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे.
राज्यात हुडहुडी वाढणार! पुणे, नाशिक, जळगावसह अनेक शहरांचे तापमान घसरले
कीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठीही महापालिका आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. कोणत्याही व्यक्तीचे किंवा राजकीय नेत्याचे अतिक्रमण असले तरी ते हटवले जाईल, तसेच कारवाई थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. विशेष म्हणजे, कारवाई रोखण्यासाठी एखाद्या व्यक्तीने महापालिका अधिकाऱ्यांना फोन केल्यास संबंधित व्यक्तीचे नाव आणि फोन नंबर सार्वजनिक करण्याचा इशारा नवल किशोर राम यांनी दिला आहे. त्यामुळे अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांना आता जाहीर होण्याची भीती निर्माण झाली आहे.
महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील व्यापारी आणि अतिक्रमणधारकांमध्ये चिंता वाढण्याची शक्यता आहे. फुटपाथवरील कब्जे, दुकानांसमोरील अनधिकृत बांधकामे आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी स्वतंत्र पथके सातत्याने कार्यरत राहणार आहेत. पुढील दोन महिन्यांत संपूर्ण पुणे अतिक्रमणमुक्त होईल, याची हमी देता येणार नसली तरी कारवाई दररोज सुरू ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. त्यामुळे आगामी काळात पुणे शहरात अतिक्रमणविरोधी मोहिमेला अधिक वेग येणार आहे.