Breaking! राहुल गांधींना जामीन मंजूर, पुढील सुनावणी 13 एप्रिलला…

Breaking! राहुल गांधींना जामीन मंजूर, पुढील सुनावणी 13 एप्रिलला…

मोदी आडनावाचा अवमान केल्याच्या खटल्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुजरातच्या सूरत सत्र न्यायालयाकडून राहुल गांधी यांचा जामीन मंजूर झालाय.या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 13 एप्रिलला होईल.

“…त्याच श्रेय नरेंद्र मोदी यांनाच जातं” म्हणून अजितदादांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज सुरत सत्र न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. यामध्ये एक याचिका जामिनासंदर्भात तर दुसरी शिक्षेला आव्हान देणारी होती. जामिनाच्या याचिकेमध्ये राहुल गांधी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

संभाजीनगरच्या सभेत इतर नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांची खुर्ची मोठी; मविआचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे ?

यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत सूरत न्यायालयात बहिण प्रियंका गांधी यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, कांँग्रेसचे प्रमुख नेते त्यांच्यासोबत आहेत. कर्नाटकात मोदी आडनावाचा वापर करत त्यांना वादग्रस्त विधान केलं होतं. वादग्रस्त विधानाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

राहुल गांधी आज दोन वर्षांच्या शिक्षेला आव्हान देणार

दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधीची खासदारकी रद्द करण्यात आलीय. दरम्यान, खासदारकी गेल्यानंतर आज राहुल गांधी यांनी जामीन आणि शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल केलीय.

कितीही ‘गौरवयात्रा’ काढल्या तरी.., वज्रमूठ सभेतून काँग्रेस नेत्याचा इशारा

जामीनाच्या याचिकेत त्यांना दिलासा मिळाला असून जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर आता राहुल गांधींना झालेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळणार का? याबाबत सध्या युक्तीवाद सुरु असून या प्रकरणाची सुनावणी 13 एप्रिलला होणार असल्याची माहिती समोर आलीय.

दरम्यान, राहुल गांधींना झालेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यास राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदारकी मिळणार असल्याचं बोललं जातंय. न्यायालयाकडून निर्णयाला स्थगिती मिळणार का? हे अद्याप अस्पष्ट असून सुनावणी ये्त्या 13 एप्रिलला स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube