बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र; ‘विष्णूबाळा’ चित्रपटात झळकणार सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ शिंदे

Sayaji Shinde's Vishnubala Marathi Movie:अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Sayaji Shinde's Vishnubala Marathi Movie

Sayaji Shinde’s Vishnubala Marathi Movie: सध्या रुपेरी पडद्यावर कलाकारांची पुढची पिढी मुख्य भूमिकांमध्ये बघायला मिळतेय. राजकारणात किंवा मनोरंजन क्षेत्रात बाप-बेटे एकत्र असणे आता नवं नाही. चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत एका विशेष जोडीचा समावेश होणार आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे (Siddharth Sayaji Shinde) आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘विष्णूबाळा’ या आगामी मराठी चित्रपटातून ही बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिद्धार्थ सयाजी शिंदे अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे.

तुमची गँगस्टरने हत्या केली, तर कुटुंबाला विम्याचे पैसे मिळतील का?; आयोगाचा निकाल अन् नियम काय?

‘विष्णूबाळा’ या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत सिद्धार्थ दिसणार आहे. ‘महाविद्यालयीन काळापासून मला या क्षेत्राची ओढ वाटू लागली. या क्षेत्रात काम करण्यासाठी मी अभिनयाचे रितसर प्रशिक्षण ही घेतले. सुरुवात करायची तर मराठी चित्रपटातून हे मी ठरवलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या पदार्पणाचा आणि वडिलांसोबत काम करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय, हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं हे दोघे सांगतात. या बाप लेकाच्या जोडीला एकत्र पाहणे निश्चितच पर्वणी असणार आहे.

‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव 15 ते 18 नोव्हेंबरदरम्यान; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

‘विष्णूबाळा’ चित्रपटाची निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि सिनेमॅटिक सफारी फिल्म प्रोडक्शन या बॅनरखाली होत असून, लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे. दिग्दर्शनाची धुरा ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातून यश मिळवलेले दिग्दर्शक अनुप जगदाळे सांभाळत आहेत. निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन यांची असून सहनिर्माते सचिन क्षीरसागर आहेत. कार्यकारी निर्माते आदित्य गायकवाड आहेत.

साई पल्लवीचा नवा अवतार, खाकीचा जबरदस्त दरारा! ​‘ओम: चैप्टर 1’ मध्ये आईपीएस नित्या रेड्डीची झलक

सत्यघटनेवर आधारलेल्या, रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us