परिवर्तनवादी चळवळ जातीवादी होतीये; समाजाचं वाटोळं सुरू, शरणकुमार लिंबाळेंचा परखड प्रहार
Sharan Kumar Limbale Statement : परिवर्तनवादी चळवळीतील वाढत्या जातीवादावर शरणकुमार लिंबाळे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Sharan Kumar Limbale Statement : परिवर्तनवादी चळवळ आता जातीवादी होत चालली असून त्यामुळे समाजाचे नुकसान होत आहे, अशी परखड भूमिका 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शरणकुमार लिंबाळे यांनी मांडली आहे. आपण सध्या अघोषित सामाजिक हुकूमशाही अनुभवत असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे साहित्य आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा इतिहास मोठा आहे. या संस्थेत वाद होत असल्याच्या बातम्या समोर आल्या, मात्र हेवेदावे आणि मतभेद बाजूला ठेवण्याची गरज असल्याचे लिंबाळे म्हणाले. 100 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन वाद संपवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राजेश पांडे आणि योगेश सोमण यांनी मदत केल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांचे आभार मानले.