सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का, जामीन रद्द करत 3 आठवड्यांत सरेंडर होण्याचे दिले आदेश

सोनमचा जामीन रद्द केला असून तिला येत्या तीन आठवड्यांच्या आत न्यायालयासमोर किंवा संबंधित यंत्रणेकडे सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design (81)

Sonam Raghuvanshi’s bail cancelled : देशभरात गाजलेल्या इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मृत राजा रघुवंशींची पत्नी सोनम रघुवंशीला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मेघालय सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने सोनमचा जामीन रद्द केला असून तिला येत्या तीन आठवड्यांच्या आत न्यायालयासमोर किंवा संबंधित यंत्रणेकडे सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत.

याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा खटला पुढील सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केलं की, जर सहा महिन्यांच्या कालावधीत खटल्याचा निकाल लागला नाही, तर सोनमला पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकार असेल. यापूर्वी 30 जून रोजी मेघालय उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला सोनंच जामीन कायम ठेवला होता. मात्र, या निर्णयाला आव्हान देत मेघालय सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सरकारच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन रद्द करण्याचा निर्णय दिला.

तुकाराम मुंढेंच्या एफडीएची बीएमसी मुख्यालयात धडक, मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन केले सील

मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सोनमच्या वकिलांना दोन पर्याय दिले होते. सोनम स्वखुशीने सरेंडर करणार का, की न्यायालयाने तिचा जामीन रद्द करण्याचा आदेश द्यावा, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात सोनम रघुवंशीने स्वतःला निर्दोष असल्याचा दावा केला. मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले असून माझ्याविरोधातील संपूर्ण प्रकरण हे केवळ परिस्थितिजन्य पुराव्यांवर आधारित आहे. केवळ आरोपांच्या आधारे दोषी ठरवता येत नाही, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी न्यायालयात केला.

दुसरीकडे, मेघालय सरकारच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, कागदपत्रांमध्ये एका कलमाचा क्रमांक टाइप करताना झालेली चूक ही केवळ तांत्रिक त्रुटी होती. अशा किरकोळ कारणावरून जामीन देणे योग्य नाही. तसेच, जामीन कायम राहिल्यास सोनम फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला.

या सर्व युक्तिवादांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने सोनम रघुवंशीचा जामीन रद्द करत तिला तीन आठवड्यांच्या आत सरेंडर करण्याचे आदेश दिले. तसेच या बहुचर्चित हत्या प्रकरणाचा खटला सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देशही न्यायालयाने संबंधित यंत्रणांना दिले.

follow us