दादांच्या अपघाताचा झिरो FIR घेण्याचा कर्नाटकला अधिकारचं नाही; फडणवीसांनी कायदाच सांगितला…

अजितदादांच्या प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी व्हावी म्हणून कर्नाटकने हा झिरो FIR नोंदवल्याचं फडणवीस म्हणाले.

Fadanvisss

अजितदादांच्या अपघात प्रकरणात कर्नाटकात नोंदवला गेलेला झिरो FIR नोंदवण्यााचा अधिकारच कर्नाटक सरकारला नसल्याचे फडणवीसांनी सभागृहात सांगितले. ते म्हणाले, की, घेतलाला झिरो FIR हा अनाधिकृत असून, झिरो FIR संदर्भातील नियम असा आहे की, ज्यावेळी व्हिक्टिम FIR करण्याच्या परिस्थितीत नसेल त्याचवेळी व्हिक्टिमला झिरो एफआयआर करता येतो. जिथे FIR करायचा जिथे ज्युरिडिक्शन आहे त्या ज्युरिजिक्शनमध्ये जर व्हिक्टिम पोहचू शकत नसेल तर, झिरो FIR होतो आणि मग तो झिरो FIR त्या पोलीस स्टेशनला कन्हर्ट होतो. त्यामुळे अशा प्रकारे झिरो FIR घेण्याचं ज्युरिडिक्शन कर्नाटकला नाही. त्यामुळे कर्नाटकने जे काही केलं आहे ते राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये तपास नीट चाललेना नाही, कुठल्यातरी दबावाखाली तपास सुरू आहे अशा प्रकारे महाराष्ट्राची बदनामी व्हावी म्हणून कर्नाटकने हा झिरो FIR नोंदवल्याचे फडणवीस म्हणाले.

अजित पवारांच्या विमानात स्फोटक पदार्थाचा अंश नाही – फडणवीस

अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन केले. यावेळी त्यांनी या अपघाताचा तपास सीआयडीकडून सुरु असल्याचे सांगितले. बारामतीत लँड होण्यापूर्वीच अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला होता. विमानात स्फोटक पदार्थाचा अंश नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

अजित दादांची जागा घेण्यासाठी त्यांना संपवल, रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

फडणवीस पुढं म्हणाले पायलट सुमित कपूर यांची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट 28 तारखेला सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी व कोपायलट शांभवी पाठक यांची टेस्ट सकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी विमानाच्या उड्डाणापूर्वी करण्यात आली. या टेस्टमध्ये अल्कोहोलचा अंश नाही. अजित पवार हे देवगिरी निवसस्थानवरून विमानतळावर सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी पोहोचले. अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विमानात बसले आणि विमान सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी मुंबई विमानतळावरून उड्डाण झाले. मुंबई विमानतळ परिसर तसेच बारामती विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले आहेत. मुंबईच्या विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजित पवार आल्याचे तसेच विमानात बसल्याचे दिसते. परंतु, बारामती विमानतळावर सदर विमान लँड होण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले.

अजित पवारांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आढळून आले?

सदर प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला असून दुर्घटनाग्रस्त विमानातील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर चार यांचे मृत्यूचे कारण डेथ ड्यू टु मल्टिपल इन्जुरीज असोसियटेड विथ बर्न इन्जुरीज असे देण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व सदस्यांचे डीएनए अहवाल आले असून ते त्यांच्या नातेवाईकांशी जुळले आहेत. पायलट व कोपायलट यांचा व्हीसेरा व रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न होत नाही. दुर्घटनाग्रस्त विमानातील सर्व मृत पावलेल्या सर्व पाच जणांचा व्हीसेरा व रक्त तपासणीत विषाचा अंश आढळून आलेला नाही. तसेच विमानातील स्फोटक पदार्थांचा अंश नसल्याबाबत राखेच्या तपासणीत न्याय सहाय्यक वैज्ञानिक शाळा यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्याचे फडणवीसांनी सभागृहात सांगितले.

 

follow us