मोठी बातमी! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

Asha Bhosle passes away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा

  • Written By: Published:
News Photo   2026 04 11T203816.680

Asha Bhosle passes away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चार वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामत अंत्यसंस्कार होणार आहे.

भारतीय संगीतसृष्टीतील (Music) ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भोसले यांच्या निधनाने संगित, कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

आशा भोसले अखेरपर्यंत संगीत क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच जगभरातील चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली होती. आशा भोसले यांनी आपल्या जादुई आवाजानं रसिकांवर मोहिनी घातली आहे. बहिण दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्यासारख्याच आशा भोसले या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि बहुमुखी गायिकांपैकी एक होत्या.

follow us