‘विसापूरचे आंदोलन शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी की राजकीय भवितव्यासाठी?’; विक्रम पाचपुतेंचा विरोधकांना सवाल

Vikram Pachpute Visapur Dam: शेतकऱ्यांना पाणी मिळणे हे माझे ध्येय, त्याचे राजकीय श्रेय मिळवणे नाही, असे आमदार विक्रम बबनराव पाचपुते म्हणाले.

Vikram Pachpute Visapur Dam: शेतकऱ्यांना पाणी मिळणे हे माझे ध्येय, त्याचे राजकीय श्रेय मिळवणे नाही, असे आमदार विक्रम बबनराव पाचपुते म्हणाले.

Vikram Pachpute Visapur Dam: श्रीगोंदा, दि. २८ नोव्हेंबर : विसापूर तलावाच्या सिंचनाच्या प्रश्नावर आज करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नापेक्षा माझ्यावर टीका करण्यावरच विरोधी नेत्यांचा अधिक भर होता. त्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी होते की स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी दिली.

डिलिमिटेशन विधेयकाने महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?, शिवसेना ठाकरे गट आक्रमक का?, आदित्य ठाकरेंनी केली सविस्तर पोलखोल

‘१४ टक्के पाणीसाठा असलेला विसापूर तलाव एकाच आवर्तनात दोनदा भरला!’

गेल्या दोन वर्षांत जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझ्या संयुक्त प्रयत्नांतून मतदारसंघात सिंचनाचे उत्तम नियोजन करण्यात आले, असे पाचपुते यांनी सांगितले.

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे श्रीगोंदा तालुक्यात, विशेषतः विसापूरच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाला. जुलै महिन्यात विसापूर तलावात अवघा १४ टक्के पाणीसाठा होता. अशाही परिस्थितीत कुकडीचे अतिरिक्त पाणी मिळवून विसापूर तलाव भरला आणि सिंचनाचे आवर्तन दिले. सिंचनामुळे पाणीसाठा ७० टक्क्यांच्या खाली गेल्यानंतर त्याच आवर्तनात दुसऱ्यांदा विसापूर तलाव भरून घेतला.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तिरुपरनकुंद्रम डोंगरावर ‘कार्तिगई दीपम’ प्रज्वलित; दीपस्तंभ उजळताच भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू!

एकाच आवर्तनात दोनदा विसापूर तलाव भरणे किती कठीण आहे, याची माजी आमदार राहुल जगताप यांना निश्चितच कल्पना असेल. हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे, असे पाचपुते म्हणाले.

‘विरोधकांनी ५ ऑक्टोबरचा शासन निर्णय अभ्यासावा!’

एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

या शासन निर्णयातील तरतुदींचा दाखला देताना पाचपुते म्हणाले की, ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवणे, प्रमुख जलाशयांतील किमान १० टक्के जिवंत पाणीसाठा अतिरिक्त आपत्कालीन साठा म्हणून राखीव ठेवणे, १६ ऑक्टोबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणी वापरात किमान १० टक्के कपात करणे आणि अनधिकृत पाणी उपसा थांबवण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत कठोर कारवाई करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लग्नाच्या नावाखाली महिलांची खरेदी-विक्री! तृप्ती भोईर यांचा ‘पारो’ चित्रपट उघड करणार भयावह वास्तव

हा शासन निर्णय केवळ श्रीगोंदा तालुक्यासाठी नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. त्यामुळे विसापूरच्या पाणी प्रश्नावर आरोप करणाऱ्यांनी राज्यातील दुष्काळाची परिस्थिती आणि शासनाचे धोरण समजून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘आमच्या प्रयत्नांचे शासकीय पत्रच पुरावे देत आहे!’

राज्यभर पाणी उपशावर निर्बंध असतानाही श्रीगोंदा तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन मी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र क्रमांक ३१२२ अन्वये जलसंपदा मंत्र्यांकडे उपसाबंदी शिथिल करण्याची मागणी केली होती, असे पाचपुते यांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याची दखल घेत सकारात्मक सूचना दिल्या. त्यानुसार कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र क्रमांक ५०४० अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना श्रीगोंदा तालुक्यातील जलसाठ्यांवरील, सीना प्रकल्प वगळून, उपसाबंदी १२ नोव्हेंबरपर्यंत शिथिल करण्याबाबत कळविले.

प्रत्यक्षात त्यानंतरही २६ नोव्हेंबरपर्यंत पाणी उपसा सुरू होता. मात्र, विरोधकांच्या भूमिकेमुळे प्रशासनाचे पुन्हा याकडे लक्ष वेधले गेले असून २७ नोव्हेंबरपासून विभागाने कारवाई सुरू केली आहे. परिणामी, केवळ विसापूरचेच नव्हे, तर तालुक्यातील इतर जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे शेतकरीही अडचणीत आले आहेत.

‘ये प्रेम मोल लिया’ पाहून आयुष्मान खुरानाची आई भावुक, चित्रपटाला दिले 100 पैकी 100 गुण, मुलाचा अभिमान व्यक्त करत म्हणाली…

आमदारांनी कोणतीही भूमिका घेतली नाही, असा आरोप करणाऱ्यांना ही अधिकृत शासकीय कागदपत्रेच उत्तर देत आहेत, असे पाचपुते यांनी म्हटले आहे.

‘श्रीगोंदा तालुका नगर जिल्ह्याला चारा पुरवू शकतो; त्यासाठीच माझे प्रयत्न!’

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून श्रीगोंदा तालुका नगर जिल्ह्याला चारा पुरवू शकतो, ही भूमिका मी शासनस्तरावर सातत्याने मांडत आहे. ही भूमिका केवळ राजकीय घोषणा नसून शासनाच्या धोरणाचा अभ्यास करून आखलेली उपाययोजना आहे, असे पाचपुते यांनी सांगितले.

५ ऑक्टोबरच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक १ (क) (i) नुसार प्राधान्यक्रमातील आवश्यक पाणीवापराच्या गरजा भागविल्यानंतर उपलब्ध पाण्यातून कमी पाणी लागणाऱ्या रब्बी हंगामी भुसार पिकांना आणि अधिक चारा देणाऱ्या भुसार पिकांना सिंचनासाठी प्राधान्य देण्याची स्पष्ट तरतूद आहे.

याच तरतुदीच्या आधारे श्रीगोंदा तालुक्यासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक शेतकरी चारा पिकांची लागवडही करत आहेत. दुष्काळात नगर जिल्ह्याचा चारा प्रश्न सोडवताना श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी आणि आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘राजकारणासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नका!’

आजच्या आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी सर्व विरोधी नेत्यांना मी यापूर्वीच खुले आवाहन केले होते. पाणी प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र यावे, पाणी मिळवण्याचे श्रेय कोणीही घ्यावे, त्याची मला अजिबात पर्वा नाही, हेही स्पष्ट केले होते, असे पाचपुते म्हणाले.

विधानसभेच्या जागा 650 होणार! 132 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर अमित शाहांचं मोठं विधान, महिला आरक्षणालाही बळ.

निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत. स्वतःची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या अडचणींचा वापर करणे कितपत योग्य आहे, याचा विरोधकांनी आत्मपरीक्षण करून विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पाणी प्रश्न हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी सुटणार नाही. त्यासाठी शासनाच्या धोरणांचा अभ्यास, उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि शासनस्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा आवश्यक आहे. सर्व विरोधी नेत्यांना माझी आजही नम्र विनंती आहे की, किमान या दुष्काळाच्या काळात तरी गलिच्छ राजकारण बाजूला ठेवावे. आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेची किंमत शेतकऱ्यांना मोजायला लावू नये, असेही त्यांनी म्हटले.

“शेतकऱ्यांना पाणी मिळणे हे माझे ध्येय आहे, त्याचे राजकीय श्रेय मिळवणे नाही. आपला संघर्ष दुष्काळाशी असला पाहिजे, एकमेकांशी नाही!” असे म्हणत पाचपुते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

follow us