नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा

मास्टरमाईंड पी. व्ही. कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा प्राध्यापक असल्याने तो केमिस्ट्रीचा पेपर फोडत होता. शुभम खैरनार हा त्याच्या साथीदारांच्या साहाय्याने बायोलॉजीचा पेपर फोडत होता.

News Photo   2026 05 16T164617.448

NEET पेपर लीक घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पेपर फोडण्यासाठी विषय ठरवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमधील दयानंद महाविद्यालयात 28 वर्ष प्राध्यापक राहिलेला आणि सध्या पुण्यात वास्तव्याला असलेला मास्टरमाईंड पी. व्ही. कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा प्राध्यापक असल्याने तो केमिस्ट्रीचा पेपर फोडत होता.

शुभम खैरनार हा नाशिकमधून अटक करण्यात आलेला त्याच्या साथीदारांच्या साहाय्याने बायोलॉजीचा पेपर फोडत होता. NEET परीक्षेत केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स या तीन विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. एकूण सातशे मार्कांच्या या परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्याचं आश्वासन आरोपींकडून विद्यार्थ्यांना दिलं जात होतं. मात्र, हे आरोपी संशय येऊ नये म्हणून सातशे मार्कांचा संपूर्ण पेपर एकत्रितपणे न फोडता विषयवार फोडत होते.

तपासासाठी पोलिसांचं पथक परराज्यात; नीट पेपर लीक प्रकरणातला म्होरक्या मराठवाड्यातलाच

दरम्यान, लातूरमधील एका प्रख्यात नीट क्लास संचालकाची जवळपास 11 तास चौकशी सीबीआय पथकाने केली. या चौकशीत काय निष्पन्न झालं हे जरी समोर आलं नसलं तरी मात्र क्लास संचालकाची 11 तास चौकशी करून हे पथक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळाली. लातूर येथील प्राध्यापक एस. पी. कुलकर्णी या प्राध्यापकाची मास्टरमाईंड म्हणून माहिती समोर आल्यानंतर सीबीआयचे पथक लातूर येथे दाखल झालं होतं. त्यांनी एका प्रख्यात क्लास चालकाची 11 तास पासून चौकशी केली. यामुळे लातूरच नव्हे तर राज्यभरात खासगी नीट क्लास चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोण आहे पी. व्ही. कुलकर्णी?

पी. व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक असून लातूर येथील दयानंद महाविद्यालयात त्याने 28 वर्ष काम केले आहे. बारावी विज्ञान शाखा आणि मेडिकल प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन यासाठी काम करत होता. पाच-सहा वर्षांपूर्वी ते निवृत्त झाल्यानंतर हाच कुलकर्णी NEET प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी संबंधित काम करत होता. सध्या तो पुण्यात आहे. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू ठेवले होते.

लातूरमधील कैलास नगरमधील घरी तो कमी राहत होता, कारण कुटुंबीय पुणे येथे राहत होते. पेपर सेट करण्याच्या समितीत कार्यरत असतानाच त्याने रसायनशास्त्राचा पेपर फोडला. पुण्यातील मनीषा वाघमारेच्या संपर्कात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांशी संपर्क करत पेपर फुटीचा आर्थिक व्यवहार केला.

follow us