भारतातल्या ३६ लाख Whatsapp अकाउंट्सवर बंदी, कंपनीने कारण हे सांगितले

  • Written By: Published:
भारतातल्या ३६ लाख Whatsapp अकाउंट्सवर बंदी, कंपनीने कारण हे सांगितले

भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसिजिंग ऍप असलेल्या व्हॉट्सअपने (Whatsapp) डिसेंबर (२०२२) महिन्यात तब्बल ३६.७७ लाख अकाउंटवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअपने आपल्या अधिकृत पोस्टमध्ये याची माहिती दिली आहे. त्याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये व्हॉट्सअपने सुमारे ३८ लाख अकाउंटवर कारवाई करून त्यांच्यावर बंदी घातली होती.

व्हॉट्सअप क्लीन आणि स्पॅम-मुक्त ठेवण्यासाठी अशी मोठी कारवाई केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. व्हॉट्सअपने आपला मासिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात हि माहिती दिली आहे. ही कारवाई १३.८९ लाख अकाउंटवर ऍक्टिवली करण्यात आली आहे. ज्यामध्ये युजर्सला कोणतीही भूमिका नमूद करण्यास पर्याय दिला नाही.

आयटी ऍक्ट २०२१ नुसार व्हॉट्सअपने डिसेंबर २०२२ च्या अहवालात म्हटले आहे की त्यांनी १ डिसेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान ३६,७७,००० अकाउंट बंद केली आहेत. यापैकी १३,८९,०००  अकाउंट युझर्सनी तक्रार करण्यापूर्वीच बॅन करण्यात आली होती.

२०२१ मध्ये केंद्र सरकारने नवीन IT ऍक्ट लागू केला आहे. त्यानुसार५० लाखांहून अधिक युझर्स असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मला दरमहा पब्लिक कंप्लायन्स अहवाल सादर करावा लागेल. यामध्ये एका महिन्यात किती तक्रारी आल्या आणि त्यावर काय कारवाई केली हे व्यासपीठाला सांगावे लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube