सरकारी नोकरीची मोठी संधी; 41000 हून अधिक पदांसाठी भरती
Govt job : सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी देशभरातील विविध विभागांत 41000 हून अधिक पदांची भरती सुरु झाली.
Govt Job : सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या (Job) उमेदवारांसाठी विविध विभागांकडून मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट, कर्मचारी निवड आयोग (SSC), उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोग (UPESSC) आणि रेल्वे भरती मंडळ (RRB) यांसारख्या संस्थांमध्ये 41000 हून अधिक पदे उपलब्ध झाली आहेत. 10 वी, 12 वी उत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या भरतीमध्ये संधि मिळणार आहे.
इंडिया पोस्टकडून ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्टर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) या पदांसाठी 23,757 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार नसून दहावीतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2026 आहे.
कुणबी प्रमाणपत्रातील अडथळे दूर करण्यासाठी सरकारचं मोठ पाऊल, मंत्री विखे पाटलांनी केली घोषणा
बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी SSC CHSL 2026 अंतर्गत 2,536 पदांची भरती सुरु आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट (JSA) आणि डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) या पदांचा यात समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना SSCच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार असून 7 ऑक्टोबर 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
उत्तर प्रदेशमध्येही प्राथमिक शिक्षकांच्या 12,405 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. Super TET 2026 अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी TET किंवा CTET उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार इच्छुक उमेदवारांनी संबंधित भरतीची पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत तपासून अर्ज करणे महत्वाचे ठरणार आहे.