भारतीयांचं लक्झरी कारप्रेम वाढलं! 2023 च्या पहिल्या सहा महिन्यात Audi कारच्या विक्रीत 97 टक्के वाढ

भारतीयांचं लक्झरी कारप्रेम वाढलं! 2023 च्या पहिल्या सहा महिन्यात Audi कारच्या विक्रीत 97 टक्के वाढ

Audi Car Sales in India: प्रीमियम कार निर्माता ऑडीने (Audi Car ) भारतीय बाजार पेठेमध्ये (Indian market) लक्झरी सेगमेंटमध्ये वर्चस्व चांगलंच ठेवल्याचे दिसून येत आहे. ऑडीने २०२३ मध्ये पहिल्या ६ महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९७ टक्के जास्त कार विकल्या आहेत. यावर्षीच्या तुलनेत जानेवारी ते जून या काळामध्ये ऑडीने ३४७४ सर्वाधिक कार विकल्या आहेत. जे पाठीमागच्या वर्षी या कालावधीत १७६५ कार विकल्या होत्या. कंपनीच्या सेकंड हँडच्या विक्रीमध्ये, म्हणजे ऑडी अप्रूव्ह्ड: प्लसद्वारे विकल्या गेलेल्या वापरलेल्या कार, गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेमध्ये या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात ५३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. Audi Q8 E-Tron येत्या काळात लाँच होणार असल्याचे सांगितले जात आहे.

नेमकं काय म्हणाले बलबीर सिंग धिल्लों? ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों यांनी सांगितले आहे की, “पुरवठ्याच्या बाजूची आव्हाने आणि वाढत असलेला खर्चाला न जुमानता, आम्ही या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यामध्ये उत्तम कामगिरी करू शकलो आहोत. Audi Q3, Audi Q3 Sportback, Audi Q5, Audi A4 आणि Audi A6 यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

सोबतच ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी ए८ एल, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू८ आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी या सर्व गाड्या आम्ही उत्तम प्रकारे विकल्या जात आहे.ऑडीशी या कराची स्पर्धा बीएमडब्ल्यू आणि व्होल्वो गाड्यांशी आहे. ऑडी इंडियाचा भारतात प्री-ओन्‍ड कार मोठा व्‍यवसाय करते. तसेच ते प्लस देखील वेगाने वाढत आहे.

Instagram Launches Threads : इन्स्टॉल, लॉग इन अन् नियम; जाणून घ्या कसं वापरायचं? इन्स्टाग्रामचं नवं अ‍ॅप

भारतात सध्या २३ ऑडी मंजूर प्लस केंद्रे आहेत आणि २०२३ च्या शेवटीला, भारतात २७ पेक्षा जास्त पूर्व-मालकीच्या कार सुविधा असणार आहेत. तसेच विद्युतीकरण धोरण पुढे नेत, ऑडी इंडियाने अलीकडेच ईव्ही मालकांसाठी माय ऑडी कनेक्ट अ‍ॅपवर चार्ज माय ऑडी उपक्रम सुरू केल्याचे देखील यावेळी सांगितले आहे. हे एक-स्टॉप सोल्यूशन आहे, जे ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना अ‍ॅपवर एका पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग भागीदारांना प्रवेश देते. ऑडी ही भारतीय बाजारपेठेमध्ये १ कोटी रुपयांच्या किंमतीच्या रेंजमध्ये अनेक वाहने विकते आणि मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि व्होल्वो यासारख्या वाहनांशी कायम स्पर्धा करत असल्याचे चित्र दिसून येते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube