Instagram Launches Threads : इन्स्टॉल, लॉग इन अन् नियम; जाणून घ्या कसं वापरायचं? इन्स्टाग्रामचं नवं अ‍ॅप

Instagram Launches Threads : इन्स्टॉल, लॉग इन अन् नियम; जाणून घ्या कसं वापरायचं? इन्स्टाग्रामचं नवं अ‍ॅप

Instagram Launches Threads : ट्विटरला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्रामकडून नवीन अ‍ॅप लाँच केलं आहे. ‘थ्रेड्स’ असं या नवीन अ‍ॅपचं नाव आहे. इन्स्टाग्रामचं हे नवीन अ‍ॅप अमेरिकेत iOS App Store दाखवण्यात आलं आहे. हे फिचर 6 जुलै रोजी लॉंच करण्यात आलं आहे. या अ‍ॅपद्वारे युजर्स आपल्या आवडत्या क्रिएटरला फॉलो करुन कनेक्ट करु शकणार आहे. या अ‍ॅपच्या मदतीने युजर आपल्या कल्पना, कंटेटनूसार स्वत:लाही फॉलोवर्स बनवू शकणार आहे. या अ‍ॅपला इन्स्टाग्रामवरुन कनेक्ट होता येणार आहे. ( To know how to use Instagram new app Threads )

NCP Political Crisis : 30 जून रोजी अजित पवारांची अध्यक्षपदी निवड; पटेलांचा गौप्यस्फोट

मात्र हे अ‍ॅप कसं वापरायचं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे हे अ‍ॅप कसं वापरायचं? याची सविस्तर माहिती जाणून घेऊ. युजर या अ‍ॅपला एका स्टॅंडलोन अ‍ॅपसारखं वापरु शकणार आहे. या अ‍ॅपमध्ये लाईक, कमेंट, रिपोस्ट, शेअरचे ऑप्शन कंपनीकडून देण्यात आले आहेत. App Store वर उपलब्ध असलेल्या स्क्रिनशॉटद्वारे या अ‍ॅपमध्ये युजर्सला टॉगलही मिळणार आहे. यासाठी युजर्सला अ‍ॅपमधील everyone, people you follow और only those mentioned in the post हे ऑप्शन मिळणार आहे.

सौरव गांगुलीचे एक ट्विट, सर्वत्र तर्क-वितर्कांना सुरुवात, काय घोषणा करणार?

हे अ‍ॅप कसं वापरायचं?

– प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर जाऊन ‘थ्रेड्स’अ‍ॅप डाऊनलोड करा.
– त्यानंतर तुम्ही तुमच्या इन्स्टाग्राम आयडीने हे अ‍ॅप लॉग इन करू शकता.
– तुम्ही तुमचा इन्स्टाग्राम डेटा थ्रेड्सअ‍ॅपवर इम्पोर्ट करू शकता.
– तुम्ही ट्विटरप्रमाणे थ्रेड्सवर छोटे ब्लॉग पोस्ट करू शकता.
– त्याची शब्द मर्यादा ट्विटरपेक्षा जास्त म्हणजे 500 आहे.
– यामध्ये तुम्हा वेब लिंक, फोटो, एक मिनिटापर्यंतचे व्हिडीओ पोस्ट करू शकता
– एकावेळी 10 फोटो पोस्ट करू शकता.
-यावर तुम्ही एखाद्याला ब्लॉक किंवा फॉलो सुद्धा करू शकता.
– मात्र यावर सध्या डायरेक्ट मॅसेजेसची सुविधा नाही.
– कंपनीने याचं डेस्कटॉप व्हर्जन लॉंच केलेलं नाही.
– सध्या हे अकाऊंट डिलीट करू शकणार नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube