कृषी वैज्ञानिक निवड मंडळात 195 पदांची भरती, पगार 56 हजार ते 1 लाख 77 हजार रुपये प्रति महिना

कृषी वैज्ञानिक निवड मंडळात 195 पदांची भरती, पगार 56 हजार ते 1 लाख 77 हजार रुपये प्रति महिना

सरकारी नोकरीच्या (Govt job) शोभात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कृषी वैज्ञानिक निवड मंडळातर्फ (Agricultural Scientific Selection Board) भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशनमध्ये या भरती संबंधित माहिती दिली आहे. या नोटीफिकेशमध्ये भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या जाहिरातीत दिलेल्या रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 मार्चपासून सुरु होणार आहे. इच्छुक उमेदवार 10 एप्रिल 2023 पर्यंत ASRB भरतीसाठी अर्ज करु शकतात. उमेदवार अर्ज हे या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेवारांना https://www.asrb.org.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

कृषी वैज्ञानिक निवड मंडळ (Agricultural Scientists Recruitment Board) मधील एकूण 195 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यामध्ये स्पेशालिस्ट टेक्निकल ऑफिसर आणि सिनिअर टेक्नीलक ऑफीसर अशा जागांचा समावेश आहे. एकूण उपलब्ध जागांपैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठामधून संबंधित विषयात आपलं पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या जागांसाठी अर्ज करु शकतात. तसेच उमेदवाराचे वय 21 ते 35 यांमध्ये असणे आवश्यक आहे. (आरक्षित वर्गांतील उमेदवारांना वयाच्या मर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे.)

अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू होईल. त्यात संगणक आधारित चाचणी (CBT), मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असू शकतो. निवड प्रक्रियेद्वारे, संस्थेकडून सर्वोत्तम गुणवत्तेचे पात्र उमेदवार निवडले जातील. रिक्त जागांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार ते 1 लाख 77 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. या वेतनश्रेणीत इतर भत्ते व लाभांसह नेमण्यात येईल. पदानुसार उमेदवारांचे वेतन ठरवले जाईल.

Old Pension साठी समिती स्थापन करणार; CM शिंदेंची विधानसभेत महत्वाची माहिती!

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवारांना 1000 रुपये नाममात्र फी भरावे लागेल. राखीव गटाला अर्जाच्या शुल्कात सुट देण्यात आली आहेत. 10 एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्याआधी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले नोटिफिकेशन नीट काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा. कारण, उमेदवारांकडून अर्ज करतांना अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज केल्यास अर्ज बाद होईल, याची नोंद उमेवारांनी घ्यावी.

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी – https://www.asrb.org.in/images/Combined-Notification-for-NET-2023,-SMS-(T-6)-and-STO-(T-6)-Examination-2023.pdf

अधिगक माहिती जाणून घेण्यााठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : https://www.asrb.org.in

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube