स्मॉल, मिड अन् लार्ज कॅप, तुमच्यासाठी कोणता ऑप्शन बेस्ट? बातमी वाचा अन् ठरवून टाका..

स्मॉल, मिड अन् लार्ज कॅप, तुमच्यासाठी कोणता ऑप्शन बेस्ट? बातमी वाचा अन् ठरवून टाका..

Mutual Fund Types : पैसे गुंतवणुकीसाठी म्युच्यूअल फंड एक (Mutual Fund) चांगला पर्याय समजला जातो. कारण यात एफडीपेक्षा जास्त (Fixed Deposite) परतावा मिळतो. परंतु, यात मिळणारा परतावा शेअर बाजारातील चढ उतारावर अवलंबून असतो. म्युच्यूअल फंडात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. आज आपण लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप यांची माहिती घेणार आहोत. शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market) करतानाही तुम्हाला हे तीन पर्याय मिळतात. म्हणून या तिन्ही पर्यायांची माहिती असणे गरजेचे आहे.

लार्ज कॅप म्हणजे काय

कंपनीचा आकार बाजारातील भांडवलाच्या माध्यमातून पाहिला जातो. कंपनीचे बाजारातील भांडवल जितके जास्त असेल तितकेच कमी नुकसान होईल. लार्ज कॅपमध्ये देशातील टॉप 100 कंपन्यांचा समावेश होतो. म्हणूनच यातील जोखीम अन्य दोन पर्यायांच्या तुलनेत कमी आहे. याला ब्लू चीप स्टॉक देखील म्हटले जाते. कंपनी मोठी असल्याने बाजारातील चढ उताराचा फारसा परिणाम जाणवत नाही.

आधी होम लोन क्लिअर कराल की SIP गुंतवणूक करताल? फायदा कशात, जाणून घ्या, सोपं गणित..

मिड कॅप म्हणजे काय

ज्या कंपन्यांचे रँकिंग 101 ते 250 पर्यंत असते त्यांचा यात समावेश होतो. या कंपन्या लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत थोड्या लहान असतात. या कंपन्यांवर शेअर बाजारातील चढ उताराचा परिणाम दिसून येतो. म्हणून यातील गुंतवणूक लार्ज कॅपच्या तुलनेत जास्त जोखमीची ठरते.

स्मॉल कॅप म्हणजे काय

स्मॉल कॅपमध्ये येणाऱ्या कंपन्यांचा आकार अतिशय लहान असतो. त्यामुळे यातील गुंतवणुकीतील जोखीम खूप जास्त असते. परंतु, जोखीम जास्त असली तरी नफा देखील जास्तच असतो.

तुमच्यासाठी कोणता ऑप्शन बेस्ट

जर तुम्ही एक चांगला पोर्टफोलियो तयार करू इच्छित असाल तर यात या तिन्ही पर्यायांना समाविष्ट केले पाहिजे. तरच तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. या बरोबरच एखाद्या सुरक्षित प्लॅटफॉर्ममध्येही गुंतवणूक करण्यास विसरू नका. या सर्व गोष्टींचा विचार करून तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य राहील याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता.

दररोज फक्त 50 रुपये बचत करा अन् करोडपतीच व्हा; जाणून घ्या, मालामाल होण्याचं गणित

follow us
  • fb
  • instagram
  • youtube