ChatGPT vs Bard : AI स्पर्धेत गुगल मायक्रोसॉफ्टची शर्यत, एआय सर्च इंजिनला मारेल का?

  • Written By: Published:
ChatGPT vs Bard : AI स्पर्धेत गुगल मायक्रोसॉफ्टची शर्यत, एआय सर्च इंजिनला मारेल का?

दोन दिवसापूर्वी टेक जायंट गुगलने आपली नव्या एआय चॅटबॉट सेवा गुगल बार्डची (Bard) घोषणा केली. बार्डची घोषणा झाल्यानंतर झाल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅटबॉट आणि टेक कंपन्यांमध्ये वर्चस्वाची शर्यत सुरू झाल्याची नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

नोव्हेंबर महिन्यात ChatGPT लॉन्च झाल्यांनतर मायक्रोसॉफ्ट गुगलच्या तुलनेत काही पावले पुढे गेली असं बोललं गेलं. पण त्याच वेळी गुगल याला टक्कर देण्यासाठी नवीन पर्याय आणणार याची देखील चर्चा सुरु होती. या चर्चेला अखेर गुगलने उत्तर दिले. गुगलने सध्या युझर्सच्या अभिप्रायासाठी त्यांची नवीन AI सेवा Bard लॉंच केली आहे. म्हणजे अजून कंपनीने सार्वजनिक वापरासाठी बार्ड सेवा सुरु केली नाही. पण त्यामुळे एआय चॅटबाबत मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्यातील शर्यत वाढली आहे.

Bard विरुद्ध ChatGPT यांच्यातील संघर्षामुळे सर्च इंजिन बंद होणार का ? असा प्रश्नही उपस्थित केला गेला. पण त्याचवेळी काल मायक्रोसॉफ्टने त्यांच्या एज ब्राऊझर आणि बिंग या सर्च इंजिनमध्ये ChatGPT इंटिग्रेट केल्याची घोषणा केली.

OpenAI म्हणजे काय?

ChatGPT सोबतच आणखी एका नावाची चर्चा आहे ते म्हणजे OpenAI. याबद्दल लोकांमध्ये खूप गोंधळ आहे. OpenAI या नावावरून लोक अंदाज लावतायेत की ते ओपन आहे. पण ते एका कंपनीचे नाव आहे आणि त्या कंपनीने ChatGPT तयार केले आहे. काही दिवसापूर्वी कंपनीने आपला प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन जाहीर केला आहे.

OpenAI कंपनीने 30 नोव्हेंबर 2022 रोजी ChatGPT लॉंच केले आहे. ओपन एआय ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर संशोधन करणारी कंपनी आहे. त्याची सुरुवात 2015 मध्ये इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमन यांनी एकत्रितपणे केली होती. पण 2018 मध्ये इलॉन मस्कने ही कंपनी सोडली. पण OpenAI या कंपनीमध्ये मायक्रोसॉफ्टसह अनेक मोठ्या टेक कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. याच गुंतवणुकीमुळे मायक्रोसॉफ्टने आपल्या उत्पादनामध्ये ChatGPT चा वापर सुरु केला आहे.

ChatGPT म्हणजे काय?

नोव्हेंबर महिन्यात ChatGPT लॉन्च झाल्यापासून ते चर्चचा विषय ठरला आहे. ChatGPT हे AI वर आधारित एक चॅटबॉट आहे. हे आधीपासून अस्तित्वात असलेल्या डेटावर आधारित प्रश्नांची उत्तरे देते. मोठ्या तात्विक प्रश्नांपासून लहान समस्यांपर्यंत तुम्ही ChatGPT ला विचारू शकता.

तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवर ChatGPT जवळपास अचूक उत्तर देते. यात ते फक्त माहितीशिवाय ते अनेक ठिकाणची माहिती वापरून त्याच विश्लेषणही करू शकते. याच कारणामुळे चॅटजीपीटी अवघ्या काही दिवसांतच जगभरात चर्चेचा विषय बनली आहे आणि आता दोन महिन्यांत १० कोटी युजर्सचा आकडा पार केला आहे.

बार्ड म्हणजे काय?

बार्ड हि देखील एक चॅटबॉट सेवा आहे. जी ChatGPT प्रमाणेच AI वर आधारित आहे. सध्या बार्ड अजून लॉन्च झालेला नाही, पण गुगलने ते कसे काम करते आणि त्याची वैशिष्ट्ये याबद्दल काही माहिती दिली आहे. त्या माहितीनुसार बार्ड LaMDA या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले गेले आहे.

हे LaMDA आणि Google च्या स्वतःच्या Conversational AI चॅटबॉटवर आधारित आहे. Google येत्या काही आठवड्यांत ती परीक्षकांसाठी उघडेल आणि चाचणीनंतर बार्ड सर्व लोकांसाठी उपलब्ध होईल.

एआय सर्च इंजिनला मारेल का?

ChatGPT लाँच झाल्यानंतर त्याची वाढती लोकप्रियता पाहून गुगलसह अनेक टेक दिग्गजांनी सर्च इंजिनला धोका असल्याचे म्हटले होते. पण आता तसे दिसत नाही. मायक्रोसॉफ्टने दोनच दिवसापूर्वी त्यांची उत्पादनामध्ये ChatGPT चा वापर केला जाणार असल्याचं सांगितलं जात. मायक्रोसॉफ्टने ChatGPTवर आधारित नवीन बिंग आणि एज ब्राउझरची घोषणा केली आहे.

पण त्याच वेळी Google ने बार्ड ची घोषणा केल्यांनतर AI टूल्सच्या मदतीने Google युजर्सना AI चा वापर करून उत्तरे देणार आहे. सध्या Google लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी इतर वेबसाइट्सच्या लिंक प्रदान करते. आता यांनतर गुगल सर्च इंजिन बंद होणार नाही यासोबत कंपनी आपल्या सर्च इंजिनसह AI चॅटबॉट अपडेट करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube