आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी, पाच हजार रिक्त जागांसाठी बंपर भरती

आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी, पाच हजार रिक्त जागांसाठी बंपर भरती

Directorate of Medical Health Services Recruitmnet 2023 : वैद्यकीय क्षेत्रातील नोकरीच्या (Jobs in the medical field) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय आरोग्य सेवा संचालनालयाच्या (Directorate of Medical Health Services) आस्थापनेतील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई येथे विविध पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आरोग्य संचालनालय अंतर्गत तब्बल 5 हजारांहून अधिक पदांची भरती करण्यात आली. तर ही भरती कोणत्या पदांसाठी केली जाणार आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची शेवटची ताऱीख याबाबतची माहिती जाणून घेऊ.

कोणत्या पदांसाठी भरती –
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरिक्षक, ई.सी.जी. तंत्रज्ञ, आहारतज्ञ, औषधनिर्माता, डॉक्युमेंटालिस्ट/ कॅटलॉगर/ प्रलेखाकार/ ग्रंथसूचीकार, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), ग्रंथालय सहाय्यक, व्यवसायोपचारतज्ञ/ ऑक्युपेशनथेरपीस्ट/ व्यवसायोपचार तंत्रज्ञ, दुरध्वनीचालक, महिला अधिक्षिका/वॉर्डन वसतीगृह प्रमुख, वसतीगृह अधिक्षिका, अंधारखोली सहाय्यक, क्ष- किरण सहाय्यक, सांखिकी सहाय्यक, दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक, भौतिकोपचारतज्ञ, दंत तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, श्रवणमापकतंत्रज्ञ /ऑडियोव्हिजन तंत्रज्ञ, शारिरिक शिक्षण निर्देशक/ शारिरिक प्रशिक्षण निर्देशक, शिंपी, सहाय्यक दंत तंत्रज्ञ, मोल्डरुम तंत्रज्ञ, लोहार / सांधाता, वाहनचालक, गृह नि वनपाल / गृहपाल / लिनन किपर, क्ष किरण तंत्रज्ञ, सुतार, कातारी – नि जोडारी, जोडारी मिश्री / बॅचफिटर, अधिपरिचारिका, उच्चश्रेणई लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, अधिपरिचारिका. या पदाच्या हजारो रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वरील पदांनुसार, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यत येत आहेत. तर या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मे 20213 आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी http://www.med-edu.in या वेबसाईटला भेट द्या.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रातील विविध जिल्हे

अर्ज पध्दत – ऑनलाईन

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष

पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टॅक्सीचालकानं आयटी अभियंत्याचा काढला काटा
अर्ज पाठवण्याच पत्ता
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.

फी-
खुला प्रवर्ग – 1000 रुपये + बॅंक चार्जेस
मागास वर्गीय/आर्थिक दुर्बल/ अनाथ – 900 रुपये + बॅंक चार्जेस

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1CFnaf-x5koZ5AFKMAb7gQO_WC0NiZPg6/view

अर्ज करण्यासाठी लिंक – https://drive.google.com/file/d/1CPKnPS9Q2rdtKWv0nAF-bP-dm02VttDZ/view

परिक्षेचा अभ्यासक्रम – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/82803/Index.html

अर्ज करण्याची श्वटीच तारीख – 25 मे 2023
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या:  http://www.med-edu.in

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube