Elon Musk यांनी ट्विटरवर स्वतःच नाव बदललं, कारण ‘हे’ सांगितले

  • Written By: Published:
Elon Musk Twitter 2

इलॉन मास्क आणि ट्विटर हे दोन शब्द सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेतील नाव असतील. आता पुन्हा एकदा मस्क चर्चेत आले आहेत. याच कारण म्हणजे त्यांनी स्वतःच्या ट्विटर अकौंटच नाव बदललं आणि नंतर स्वतःला ट्विटर नाव बदलायची परवानगी देत नाही असं ते म्हणाले आहेत.

एलॉन मस्क यांनी स्वतःच दिली याची माहिती

एलॉन मस्क यांनी आपलं नाव ट्विटरवर बदलून MR. TWEET असं केलं आहे आणि स्वतः मस्क यांनीच याची माहिती ट्विट करून दिली. याच ट्विट मध्ये ते असंही म्हणाले की मी माझं नाव बदललं आहे पण आता मला ट्विटर माझं नाव बदलू देत नाही.

इलॉन मस्क यांच्या या ट्विटमुळे ट्विटरच्या मालकाला ट्विटर नाव बदलू देत नाही. याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. त्यावर अनेक ट्विटर युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लाखो युझर्सनी या ट्विटला लाईक करून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Tags

follow us