ESIC Recruitment : कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू, थेट मुलाखतींच्या फेरीतून होणार निवड

ESIC Recruitment : कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू, थेट मुलाखतींच्या फेरीतून होणार निवड

ESIC Pune Bharti 2023: सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे (Employees State Insurance Corporation) यांनी वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अतंर्गत एकूण 14 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदावार हे त्यांचे अर्ज ऑफलाईन किंवा इमेलद्वारे पाठवू शकतात. मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख 6 सप्टेंबर 2023 आहे.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिली आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीला येतांना आवश्यक ती शैक्षणिक कागदपत्रे जोडावीत. या भरतीसाठी, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात कोणताही सवलत नाही. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. कारण अर्जात काही त्रुटी आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

एकूण पदांची संख्या – १४

शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेले असावं. तसेच शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

पगार – 85,000 रुपये

नोकरी ठिकाण – पुणे

इंडिया आघाडीत जागावाटपाचा रनर-अप फॉर्म्युला; ठाकरे गट, राष्ट्रवादी अन् काँग्रेसला फायदा की तोटा? 

निवड प्रक्रिया –
ESIC मधील ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असून उमदेवारांनी जाहिरातीमध्ये दिलेली पात्रता आणि अटींच्या चौकटीत बसत असणाऱ्या उमेदावारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे.

मुलाखतीचा पत्ता –
ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे-37

मुलाखतीची तारीख – 6 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – http://www.esic.nic.in

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1m1IdTiQdVvnV_msF2MS5H1VKot3j3ag5/view

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube