फेसबुकवर पोस्ट करण्यास अडचणी, फेसबुक डाऊन? युजर्समध्ये खळबळ

  • Written By: Published:
फेसबुकवर पोस्ट करण्यास अडचणी, फेसबुक डाऊन? युजर्समध्ये खळबळ

Facebook Down : जगभरातील कोट्यवधी नेटीझन्सचं आवडतं सोशल प्लॅटफोर्म असलेलं फेसबुक Facebook) अचानक डाऊन झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. फेसबुकवर पोस्ट करण्यास अनेक युजर्संना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. फेसबुक सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे अद्याप समजू शकलं नाही.

चुकीला माफी नाही; भारत-बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित शर्माला पुणे पोलिसांनी ठोठावला दंड 

फेसबुकचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळं पोस्ट करणं बंद झालं आहे. Facebook वर पोस्ट केल्यानंतर ‘ओप्स… माफ करा, काहीतरी गडबड झाली. आम्ही गुंता सोडवण्याचं काम करतोय, असा मेजेस येत आहे. त्यामुळे फेसबुक डाऊन झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अद्याप फेसबुककडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. फेसबुक डाऊन होताच एक्सवर फेसबुक डाऊन ट्रेण्ड सुरू झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ञ असणाऱ्या व्यक्तींना देखील यामागचं कारणं समजू शकलं नाही.

रात्री साडेनऊ वाजल्यापासून फेसबुक यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक बिघाडामुळं अनेकाना त्रास सहन करावा लागत आहगेत. अनेक कंटेट जनरेट करणाऱ्या कंपन्यांचं काम ठप्प झालं आहे.

फेसबुक डाऊन झाल्यानंतर काही लोकांनी काही मजेदार ट्विटही केले आहेत. फेसबुक डाउन झाल्यानंतर सर्व युजर्स ट्विटरवर कसे येतात? यावर विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आलं.

युजर्स संभ्रमावस्थेत
फेसबुक डाऊन झाल्यामुळे अनेक बड्या कंपन्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होतं. कारण या कंपन्या फेसबुकवर व्यवसाय करतात. फेसबुक डाऊन झाल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. या कंपन्या वेगवेगळे व्हिडिओ शेअर करतात. हे व्हिडिओ लाखो युजर्सनी पाहतात. यातून या कंपन्यांना जाहिराती मिळतात. या जाहिरातीतून करोडो रुपये कमावले जातात. त्यामुळे फेसबुक डाऊन झाल्यामुळे या कंपन्यांना निश्चितच नुकसान होतं. मात्र, फेसबुक डाउनच्या वृत्तावर अद्याप फेसबुककडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळं युजर्स संभ्रमावस्थेत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube