गियर असलेली पहिली इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च
नवी दिल्ली : आजवर तुम्ही विनागियर असलेल्या इलेक्ट्रिक बाईक पाहिल्या असतील मात्र आता चक्क गियरवाली इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च करण्यात आली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे. नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, भारतीय स्टार्टअप मॅटर एनर्जीने (Matter Energy) आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक दाखवली, ही बाईक खूप लोकप्रिय झाली कारण ती देशातील पहिली गियर इलेक्ट्रिक बाइक म्हणून आली.
ऑटो एक्सपोमध्ये फक्त ही बाईक सादर करण्यात आली होती, मात्र कंपनीने तिची किंमत आणि इतर फीचर्सबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र आता तिच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत सर्व माहिती समोर आली आहे. या इलेक्ट्रिक बाईकचे नाव AERA आहे, आणि ती चार प्रकारांमध्ये येते – AERA 4000, AERA 5000, AERA 5000+, AERA 6000+, ज्याची एक्स-शोरूम किंमत 1,43,999 ते 1,53,999 रुपये आहे.
Aera चे दोन्ही प्रकार जे पहिल्या टप्प्यात उपलब्ध केले जातील ते लिक्विड-कूल्ड, 5kWh बॅटरी पॅकसह 10.5kW च्या पीक पॉवर आउटपुटसह येतात. या बाईक रिव्हॉल्ट RV400, Torq Kratos इत्यादी इतर इलेक्ट्रिक मोटरसायकलशी स्पर्धा करतील.
Budget Session: ‘त्या’ बॅनरवरुन मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीला चिमटे, ‘एकदा ते ठरवा’
कधीपासून होणार बुकिंग?
ही इलेक्ट्रिक बाईक 125 किमीची रेंज देण्यास समर्थ आहे. कंपनीचे म्हणणे आहे की Aera 6000+ व्हेरियंटमध्ये एका चार्जमध्ये 150 किमी अंतर कापले जाऊ शकते. कंपनीने उत्पादन विकसित करण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. या मॉडेलचे बुकिंग या महिन्यात सुरू होईल, तर डिलिव्हरी या वर्षी एप्रिल-मेच्या आसपास सुरू होण्याची अपेक्षा आहे.
Manish Sisodia Bail Application : ‘आप’चे मनीष सिसोदिया यांचा राऊस एव्हेन्यू कोर्टात जामीन अर्ज दाखल
फीचर्स:
सुरक्षेसाठी, बाइकला सिंगल चॅनल एबीएस आणि ड्युअल सेन्सर्ससह डिस्क ब्रेक मिळतात. कनेक्टिव्हिटीसाठी, बाइकमध्ये 4G, वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाचा एलसीडी टचस्क्रीन डिस्प्ले देखील समाविष्ट आहे. या बाईकमध्ये तुम्हाला किती बॅटरी शिल्लक आहे हे देखील कळेल. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनद्वारे ही बाईक कनेक्ट करू शकता.