Gold Price Today: सोन्याच्या दराने तोडले आतापर्यंतचे रेकॉर्ड, चांदी मात्र घसरली

Gold Price Today: सोन्याच्या दराने तोडले आतापर्यंतचे रेकॉर्ड, चांदी मात्र घसरली

मुंबई : सोन्याच्या भावामध्ये दररोज प्रचंड मोठी वाढ होत आहे. या किंमती आता गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला खिसा खाली करावा लागणार आहे. आज मंगळवार, 24 जानेवारी, 2023 ला सोन्याच्या दराने आतापर्यंतचे रेकॉर्ड तोडले आहे. दुसरीकडे मात्र चांदीचे दर घसरले आहेत.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोशिएशनच्या बेवसाईटनुसार आज सोन्याचा भाव 24 कॅरेटसाठी 57,250 रूपये आहे तर 22 कॅरेटसाठी तुम्हाला 52,479 रूपये मोजावे लागणार आहेत. कालच्या तुलनेत सोन्याच्या भावामध्ये 420 रूपायांनी वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याचा भाव 56, 830 होता. तर दुसरीकडे मात्र चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर 68,420 प्रतिकिलो आहेत.

त्यामुळे आता ऐन सणासुदीच्या आणि लग्न सराईच्या तोंडावर सोन्याच्या भावामध्ये दररोज प्रचंड मोठी वाढ होत आहे. या किंमती आता गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे सामान्यांसह सर्व नागरिकांना मोठी झळ बसली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचा भावामध्ये दरवाढ होत असली तरी सोने खरेदीची मात्र कमी झालेली नाही. अमेरिकेमध्ये सोन्याचा भाव 5.74 डॉलर इतक्या वाढलेल्या भावाने आहे. 1,937.21 डॉलर प्रति अडिच तोळे असा भाव आहे. तर चांदी कारोबार 0.18 डॉलर इतक्या वाढलेल्या भावाने आहे. 23.59 डॉलर प्रति अडिच तोळे असा भाव आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube