Gold Prices Fall: सोन्याच्या किंमती घसरताच ‘सेल’चा ट्रेंड; घराघरातील जुने सोने बाजारात, सोनं आणखी किती स्वस्त होईल ?

Gold and Silver Rate-अनेक भारतीय कुटुंबे जुने दागिने बदलून नवीन घेण्याऐवजी थेट विकण्याचा निर्णय घेत आहेत.

  • Written By: Published:
Gold Rate

Gold and Silver Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात सोने, चांदीच्या किंमती घसरू (Gold and Silver Rate) लागल्या आहेत. त्यामुळे भारतातही सोने, चांदीच्या किंमती घटल्या आहेत. त्यामुळे भारतीय ग्राहक सोने खरेदीसाठी रांगा लावतील, असे तुम्हाला वाटत असेल. पण थांबा. कारण आता उलट परिस्थिती निर्माण झालीय. जुने सोने विक्रीसाठी रांगा लावल्या जात आहेत. गेल्या दोन महिन्यात जुने सोने किती विकले गेले आहेत. आता सोन्याचे भाव किती टक्क्यांनी घसरेल. भविष्यात सोन्याचा भाव किती हजारापर्यंत येईल हे लेट्सअप मनीमध्ये जाणून घेऊया…

सोन्याचा किमती विक्रमी उच्चांकावरून घसरल्या आहेत. अनेक भारतीय कुटुंबे जुने दागिने बदलून नवीन घेण्याऐवजी थेट विकण्याचा निर्णय घेत आहेत. कारण पुढील काळात सोन्याचे दर आणखी घसरल्यास दागिन्यांना मिळणारी किंमत कमी होईल, अशी भीती ग्राहकांमध्ये निर्माण झालीय. दोन दिवसांपूर्वी एमसीएक्सवर (MCX) 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 1,44,199 रुपये होता. हा दर सोन्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीपेक्षा लक्षणीय कमी आहे. त्यामुळे अनेक ग्राहक जुने दागिने एक्स्चेंज करण्याऐवजी थेट विक्रीकडे वळत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने तशी आकडेवारीच जाहीर केलीय. या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2026 या तिमाहीत भारतीय कुटुंबांनी सुमारे 50 टन जुने सोने विकले आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही विक्री 43 टक्क्यांनी अधिक आहे.

लोक जुने दागिने का विकत आहेत?
या वर्षी सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या होत्या. दहा ग्रॅमचा भाव 1 लाख 94 हजारांच्या आसपास गेला होता. गेल्या काही आठवड्यांत भावामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना वाटते की आता भाव आणखी खाली येऊ शकतात. सध्या सोन्याचा भाव 1 लाख 40 हजारांच्या आसपास आहे. म्हणजे गेल्या काही दिवसांत सोने 54 हजारांनी स्वस्त झालय. जवळ 26 टक्के भाव घटला आहेत. तर चांदीचा दर 2 लाख 16 हजार रुपये किलो इतका आहे. चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांत चांदीचा दर 46 हजारांनी घटला आहे. गेल्या 2008 नंतरची सोन्याच्या किंमतीत ही सर्वात मोठी घसरण आहे. तर बाजारातील काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की, आगामी काळात सोन्याचा भाव 1.20 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीपर्यंत खाली येऊ शकतो. त्यामुळे भविष्यात आणखी नुकसान होण्यापूर्वी अनेक गुंतवणूकदार आणि ग्राहक जुने सोने विकून नफा निश्चित करण्याचा किंवा रोख रक्कम उभी करण्याचा पर्याय निवडला आहे.


मोदींच्या आवाहनाचा किती परिणाम ?

भारत सोने आयात करते. त्यासाठी परकीय चलन द्यावे लागते. त्यासाठी कच्चा तेलाचे भाव वाढून 120 डॉलरवर गेले होते. त्यामुळे 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक वर्ष सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोने व चांदीवरील आयात शुल्क 6 टक्क्यांवरहून 15 टक्क्यांपर्यंत वाढविले होते. त्यामुळे सोन्याची आयात घटली होती. देशात महिन्याला 70 ते 100 टन सोने आयात केले जात होते. आता 25 ते 30 टन सोने आयात केले जात आहेत. म्हणजे सोने आयात निम्माने घटले आहे. त्यात वाढलेल्या दरामुळे भारतीय सोने खरेदी गरजेपुरतेच करत होते. सध्याची घसरण केवळ देशांतर्गत धोरणांमुळे नाही, तर जागतिक बाजारातील मौल्यवान धातूंवरील विक्रीचा दबावही कारणीभूत असल्याचे बाजारातील तज्ज्ञ सांगतात. ऑगमाँटच्या संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. रेणिशा चैनानी यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती जानेवारी 2026 मधील उच्चांकापासून जवळपास 30 टक्क्यांनी घसरल्या आहेत.


सोने घसरण्यामागे आंतराष्ट्रीय कारणे

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झालीय. जून महिन्यात स्पॉट गोल्डच्या किंमती सुमारे 13% घसरल्या आहेत. ही ऑक्टोबर 2008 नंतरची सर्वात मोठी मासिक घसरण ठरलीय. अमेरिकेचे फेडरल बँक व्याजदर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकी डॉलर मजबूत होणे आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीऐवजी इतर पर्यायांकडे वळले आहेत, या आंतरराष्ट्रीय कारणामुळे सोन्याचे दर घसरले आहेत.

follow us