Indian Postal Department Recruitment : गुडन्यूज, पोस्ट खात्यातील 12828 पदांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

Indian Postal Department Recruitment : गुडन्यूज, पोस्ट खात्यातील 12828 पदांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

Indian Postal Department Recruitment : काही दिवसांपूर्वी भारतीय टपाल विभागाने (Indian Postal Department) तब्बल हजारो विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित केली होती. अनेकांनी या भरतीसाठी अर्ज केले असतीलच. मात्र, ज्यांनी अद्याप अर्ज केले नाहीत, त्यांना अर्ज करता यावे म्हणून अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. (Good news for post recruitment aspirants, Indian Postal Department Recruitment Application Deadline Extended,)

भारतीय पोस्ट मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा आणि मणिपूरसाठी ग्रामीण डाक सेवक (GDS) (शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टल मास्टर (ABPM)/डाक सेवक) पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. अधिकृत माहितीनुसार, नोंदणी लिंक 16 जूनपासून सक्रिय होईल. यासाठी उमेदवार 23 जूनपर्यंत अर्ज करू शकतात, अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे. एकदा लिंक सक्रिय झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट, indiapostgdsonline.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. 12828 पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.

24 जून ते 26 जून पर्यंत, उमेदवार संपादन विंडोद्वारे त्यांचे अर्ज संपादित करू शकतात. ज्या उमेदवारांनी 11 जूनपर्यंत अर्ज सादर केले आहेत ते 24 जून ते 26 जूनपर्यंत त्यांचे अर्ज संपादित करू शकतात. या भरतीसाठी पहिला अर्ज 11 जून रोजी बंद करण्यात आला होते, त्यानंतर ते 16 जूनपासून पुन्हा उघडले जातील. उमेदवार खाली दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज करू शकतात.

रोहित शर्माच्या कसोटी कर्णधार पदाबाबत, सौरव गांगुलीचे मोठे विधान

पदाचे नाव –
1. शाखा पोस्टमास्टर (BPM)
2. सहाय्यक शाखा पोस्टल मास्टर (ABPM)

वयोमर्यादा
भारतीय टपाल विभाग भरती 2023 साठी वयोमर्यादा 11 जून 2023 रोजी उमेदवाराचे वय 18-40 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमानुसार SC/ST/OBC उमेदवारांसाठी वयात सवलत दिली जाईल.

अर्ज फी-
भारतीय टपाल विभागाच्या या भरतीसाठी अर्ज शुल्क हे 100 रुपये आहे. सर्व महिला अर्जदार, SC/ST अर्जदार, PWD अर्जदार आणि ट्रान्सवुमेन अर्जदारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

पगार –
BPM- 12,000 ते 29,380
ABPM- 10,000 ते 24,700

मुळ जाहिरात – https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Model_Notification.pdf

अंतिम मुदतवाढ अधिसूचना –
https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Addendum.pdf

शाखानिहाय पोस्ट अधिसूचना – https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Final_Post_Consolidation.pdf

अर्ज कसा करायचा
-सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे.
-त्यानंतर उमेदवारांची नोंदणी करावी आणि नंतर अर्ज भरावा.
-त्यानंतर उमेदवारांनी विचारलेली माहिती भरून अर्जाची फी भरावी.
-अर्जाची फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube