मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती
LetsUpp l Govt.Schemes
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के क्षेत्र मर्यादेपर्यंत पाच हेक्टर क्षेत्रापर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.(Govt.Schemes Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme )
राष्ट्रवादीतला संघर्ष पेटला, दोन्ही गटांनी बजावला व्हीप; आमदारांंची गोची
योजनेचा लाभ घेण्याच्या अटी :
– या योजनेसाठी इच्छुक शेतकरी यांना जास्तीत जास्त पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित या योजनेअंतर्गत लाभ घेता येतो. त्याशिवाय या योजनेचा लाभ त्यांना देता येणार नाही.
– शेतकऱ्याच्या नावे मालकी हक्काचा सातबारा आणि आठ अ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
– सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी आणि त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असावी.
– सातबारा उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे आदीबाबत शेतकऱ्याकडून स्वयंघोषणापत्र घेण्यात यावे.
– शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
– एखादा लाभधारक योजनेत सहभागी होण्यास पात्र आहे. मात्र त्याच्याकडे आधार क्रमांक नाही. अशा लाभार्थ्यांना आधार क्रमांक प्राप्त होईपर्यंत आधार नोंदणी पावती किंवा मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा शासकीय कर्मचारी असल्याचे ओळखपत्र किंवा बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक किंवा नरेगा कार्ड किंवा किसान फोटो यांपैकी पुरावा सादर केल्यास योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे.
पुण्यातील आमदार तुपे, टिंगरे नेमके कुणाबरोबर ? दोघांची राष्ट्रवादीच्या बैठकीला दांडी !
आवश्यक कागदपत्रे :
– सातबारा उतारा स्वतःच्या (मालकी हक्कासाठी) आठ अ उतारा (एकूण क्षेत्राच्या माहितीसाठी)
– सामायिक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान मागणीसाठी अर्ज केला असल्यास ते ज्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसवणार आहेत त्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसवण्यास तसेच त्यांच्या नावे अनुदान वर्ग करण्यास हरकत नसल्याबाबत इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करणे बंधनकारक आहे. ते साध्या कागदावर घेण्यात यावे.
– लाभार्थी किंवा संस्था यांना शेतजमीन भाडेतत्त्वावर घेऊन सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास मालकी हक्क असलेल्या सातबारा, आठ अ आणि लाभार्थ्यांनी अर्ज मंजूर झाल्याच्या दिनांक पासून सात ते दहा वर्षासाठी शेतमालकासोबत असलेल्या कराराचे पत्र.
शेतकरी गट/सहकारी संस्था/शेतकरी उत्पादक कंपनी/पंचायत राज संस्था यांनी अनुदान मागणीसाठी अर्ज केला असल्यास, संस्था प्रमुख किंवा गटप्रमुख ज्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसवणार आहेत.
– त्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविण्यास तसेच त्यांचे नावे अनुदान देण्यास हरकत नसल्याबाबत इतर सदस्यांचे सहमती पत्र.
संचासाठी मापदंड
ठिबक संचासाठी
मापदंड/हे. रुपये
1.5x 1.5 मी – 97245 रु
1.2x 0.6 मी – 127501 रु.
5x 5 मी – 39378 रु.
6x 6 मी – 39378 रु.
10x 10 मी – 26181 रु.
तुषार संचासाठी
मापदंड रुपये
75 मिमी पाइप करिता – 24194
63 मिमी पाइप करिता – 21588
अर्ज कुठे करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करावा लागेल. हा अर्ज शेतकरी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा संगणक किंवा सीएससी सेंटर किंवा ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र या ठिकाणी देखील करू शकतो.