घरात सायलेंट मोडला गेलेला फोन शोधतांना तुमचीही दमछाक होते? मग ‘या’ टेक्नो टिप्स वापराच…
How To Find Silent Phone आजच्या धावपळीच्या जीवनात फोन हरवणे ही एक मोठी डोकेदुखी ठरते. त्यातही जर तो फोन 'सायलेंट' मोडवर असेल, तर...
Smart Tips For Finding Silent Mobile Phone : आजच्या धावपळीच्या जीवनात फोन हरवणे ही एक मोठी डोकेदुखी ठरते. त्यातही जर तो फोन ‘सायलेंट’ मोडवर असेल, तर तो शोधणे अधिकच कठीण होऊन बसते. अनेकदा आपण घाईघाईत फोन कुठे ठेवला, हे विसरून जातो आणि तासनतास शोधाशोध करतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही सायलेंट असलेला फोन अगदी काही मिनिटांत शोधू शकता. नेमकं कसं? त्याबद्दल जाणून घेऊया..
नेमका सायलेंट फोन शोधायचा कसा?
जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर, तुम्ही सर्वात खात्रीशीर आणि प्रभावी असा ‘Find My Device’ चा वापर करून शकता. यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या फोनवरून किंवा संगणकावरून [google.com/android/find](https://google.com/android/find) या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. येथे तुमच्या फोनशी लिंक असलेल्या गुगल अकाउंटने लॉग-इन केल्यानंतर ‘Play Sound’ हा पर्याय निवडा. यामुळे तुमचा फोन सायलेंट मोडवर असला, तरी तो 5 मिनिटांपर्यंत पूर्ण आवाजात वाजू लागेल.
आयफोन यूजर्सने कसा शोधायचा फोन?
आता आपल्यापैकी अनेकजण आयफो वापरतात. त्यामुळे जर तुम्ही आयफोन यूजर असाल आणि तुमचा फोन सायलेंटला गेल्यामुळे सापडत नसेल तर, अजिबा काळजी करू नका. सायलेंट फोन मिनिटात शोधण्यासाठी [icloud.com/find](https://icloud.com/find) ही वेबसाईट अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी तुमच्या Apple ID ने लॉग-इन करून फोन निवडा आणि ‘Play Sound’ वर क्लिक करा, तुमचा फोन जोरात वाजायला लागेल.
वरील खास टिप्स शिवाय तुम्ही जर स्मार्टवॉच वापरत असाल आणि ते तुमच्या फोनशी कनेक्ट असेल, तर वॉचमधील ‘Find My Phone’ या फिचरवर क्लिक करू शकता. यामुळे सायलेंट मोडवर गेलेला फोन वाजायला सुरुवात होईल. याशिवाय, जर तुम्ही फोनमध्ये ‘Hey Google’ किंवा ‘Hey Siri’ हे फिचर आधीच सुरू ठेवले असेल, तर मोठ्याने “Hey Google, where are you?” किंवा “Hey Siri, find my phone” अशी साद घालूनही फोनला प्रतिसाद देण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.