Dementia : धक्कादायक ! भारतातील एक कोटीहून अधिक वृद्धांना ‘या’ आजाराचा धोका

Dementia : धक्कादायक ! भारतातील एक कोटीहून अधिक वृद्धांना ‘या’ आजाराचा धोका

नवी दिल्ली : भारतातील वृद्धांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे काळजी वाढली आहे. भारतातील एक कोटीहून अधिक वृद्धांना डिमेंशियाचा (स्मृतिभ्रंश) धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं या शोधात समोर आलं. 60 पेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना हा धोका असल्याचं देखील सांगण्यात आलं. हा शोध एम्ससह जगभरातील अनेक प्रतिष्ठीत विद्यापीठांकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे.

या अभ्यासामागील विशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारे आर्टिफिशिअल इंटालिजन्सचा वापर करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल माहिती देताना सांगितले की, डिमेंशिया (स्मृतिभ्रंश) हा वाढत्या वयासोबत होणारा एक आजार आहे. या आजारामुळे व्यक्ती मानसिकरित्या कमजोर होतो.

या अभ्यासामध्ये समोर आलेली माहिती अशी की, भारतातील एक कोटीहून अधिक वृद्धांना डिमेंशियाचा (स्मृतिभ्रंश) धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं या शोधात समोर आलं. 60 पेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना हा धोका आहे. हा दर 8.44 टक्के असेल. म्हणजे भारतातील 10.08 मिलियन वृद्धांना डिमेंशियाचा (स्मृतिभ्रंश) धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये हा दर 8.8 टक्के, ब्रिटनमध्ये 9 टक्के, जर्मनी आणि फ्रान्समध्ये 8.5 आणि 9 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

महिला दिनी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, ब्रेस्ट कँसर रुग्णांसाठी मोठं गिफ्ट

त्याचबरोबर या अभ्यासामध्ये हे देखील समोर आले आहे की, डिमेंशियाची (स्मृतिभ्रंश) समस्या जास्त वय असणारे लोक, महिला, अशिक्षित आणि ग्रामीण भागात राहणारे लोक यांना आहे. ब्रिटन विद्यापीठाचे हाओमिआओ जिन यांनी सांगितलं की, हा भारतातील आमचा शोध पहिला देशपातळीवरील अभ्यास होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube