गजकेसरी योगाचा शुभ संयोग! वृषभ, सिंहसह अनेक राशींच्या आयुष्यात वाढणार आनंद; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

horoscope पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे उच्च राशीतील गोचर आणि गुरूसोबत केंद्रस्थानी असणाऱ्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे.

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य; कर्क आणि कन्या राशीच्या लोकांना बुधवारी फायदा होईल

Joy will increase in lives of several zodiac signs, including Taurus and Leo find out your horoscope for today : आज २४ नोव्हेंबर रोजी चंद्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच वृषभ राशीत संचार करणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कृत्तिका नक्षत्रातून प्रवास करत त्यानंतर रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे उच्च राशीतील गोचर आणि गुरूसोबत केंद्रस्थानी असणाऱ्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. या शुभ योगाचा वृषभ आणि सिंह राशीसह अनेक राशींना फायदा होण्याची शक्यता आहे. काही राशींच्या जीवनात सुख-समृद्धी आणि आनंद वाढू शकतो. तसेच धार्मिक प्रवासाचेही योग जुळून येत आहेत. चला तर मग, उच्च राशीतील चंद्राच्या गोचराचा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मेष ते मीन या सर्व राशींवर काय परिणाम होणार आहे, जाणून घेऊया आजचे राशिभविष्य.

मेष रास : कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल
मेष राशीच्या व्यक्तींसाठी आज चंद्राचे दुसऱ्या स्थानातील गोचर कौटुंबिक बाबतीत अनुकूल ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करू शकता. मालमत्तेशी संबंधित कामांसाठीही कार्तिक पौर्णिमेचा दिवस शुभ ठरेल. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या हातून एखादे शुभकार्य घडू शकते.

वृषभ रास : जवळच्या व्यक्तींच्या भेटीचा योग
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आज चंद्राचे स्वतःच्या राशीतील गोचर शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढेल. स्वतःसाठी काही नवीन वस्तूंची खरेदी करण्याचा विचार करू शकता. एखादा मित्र किंवा जवळच्या नातेवाईकाची भेट होण्याची शक्यता आहे. विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या विवाहाची बोलणी पुढे सरकू शकतात. मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. मुलांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. तुमच्या हातून एखादे पुण्यकर्मही घडू शकते.

मिथुन रास : भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल
मिथुन राशीच्या व्यक्तींना आज काही कारणांमुळे आपल्या कामाच्या नियोजनात बदल करावा लागू शकतो. दिवसाचा पूर्वार्ध काहीसा सुस्तीत जाईल. मात्र, वैवाहिक जीवनात प्रेम आणि परस्पर सहकार्य कायम राहील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. भाऊ-बहिणींकडून सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. शरीराच्या वरच्या भागात काही त्रास जाणवू शकतो. वात आणि कफ वाढवणारे पदार्थ खाणे टाळावे. शेजाऱ्यांकडूनही मदत मिळण्याची शक्यता आहे. आज आवडीच्या खाद्यपदार्थांची मेजवानी मिळू शकते.

कर्क रास : आर्थिक लाभामुळे आनंद मिळेल
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे वृषभ राशीतील गोचर लाभदायक ठरणार आहे. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळेल आणि अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडील आणि वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमधून फायदा होऊ शकतो. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा आज पूर्ण होऊ शकते. व्यवसायात फायदा झाल्याने आनंद मिळेल. वाहन आणि इतर सुख-सुविधांच्या वस्तू मिळण्याचे योग आहेत. आजारी असलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

सिंह रास : लाभ मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतील
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा मंगळवार शुभ ठरणार आहे. तुमच्या राशीत गुरु विराजमान असून चंद्राच्या केंद्रस्थानी असल्यामुळे गजकेसरी योगाचा लाभ मिळू शकतो. धार्मिक आणि पुण्यकर्म करण्याची संधी मिळेल. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. वडील आणि गुरुजनांकडून मिळणारे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एखादी चांगली संधी मिळू शकते. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवता येईल. तसेच जवळचा किंवा लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

कन्या रास : भेटवस्तू मिळण्याची शक्यता
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यस्थानातील चंद्राचे गोचर शुभ ठरणार आहे. त्यातच बुध आणि शुक्राची युती अनुकूल योग निर्माण करत आहे. त्यामुळे आज तुम्ही मनाप्रमाणे कामे आणि नियोजन पूर्ण करू शकाल. एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाईकाकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादी मोठी संधी मिळू शकते. तुमच्या बोलण्यातील कौशल्याचा आज विशेष फायदा होईल. नवीन मित्रमैत्रिणी जोडले जाण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

तूळ रास : जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी कार्तिक पौर्णिमेचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहू शकतो. तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्येक परिस्थितीत जोडीदाराची साथ मिळेल. दिवसाच्या पूर्वार्धात कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे दैनंदिन वेळापत्रकात बदल करावा लागू शकतो. कंबर आणि गुडघ्यांशी संबंधित त्रास जाणवण्याची शक्यता आहे. उत्साहाच्या भरात क्षमतेपेक्षा जास्त कामे अंगावर घेणे टाळा. दिवसाच्या तुलनेत संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ अधिक आनंददायी आणि रोमँटिक राहील. एखाद्या खास व्यक्तीची भेट झाल्याने मन प्रसन्न होईल.

वृश्चिक रास : नवीन कामाची सुरुवात करू शकता
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी चंद्र आणि सूर्याच्या समसप्तक योगामुळे आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या पार पाडतानाच मनोरंजनाचे क्षणही अनुभवता येतील. तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. मालमत्तेशी संबंधित कामांमधून फायदा होण्याची शक्यता आहे. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मात्र, भाऊ-बहिणींसोबत वागताना संयम ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा मतभेद होऊ शकतात. सासरच्या मंडळींकडून सहकार्य मिळेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस अनुकूल ठरू शकतो.

धनु रास : कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते
धनु राशीच्या व्यक्तींसाठी कार्तिक पौर्णिमेचा दिवस संमिश्र राहण्याची शक्यता आहे. राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचे गोचर होत असल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी आणि पुरेशी विश्रांती याकडे लक्ष द्या. आज एखादी अतिरिक्त कौटुंबिक जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. मित्र किंवा नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. गरजू व्यक्तीला मदत केल्याने मानसिक समाधान मिळेल. वैवाहिक जीवनातील परिस्थिती सामान्य राहील. मात्र, जोडीदाराकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवणे टाळा.

मकर रास : आज लाभ मिळण्याची संधी
मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा मंगळवार शिक्षण आणि तांत्रिक क्षेत्राशी संबंधित कामांसाठी अनुकूल ठरणार आहे. मात्र, खाण्यापिण्याच्या बाबतीत संयम ठेवणे आवश्यक आहे. चवीच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो. परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा काम करणाऱ्या व्यक्तींना आज लाभाची संधी मिळू शकते. आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि चातुर्याच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीही अनुकूल बनवता येईल. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने दिवस चांगला राहील. मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवल्याने मन प्रसन्न होईल.

कुंभ रास : आज पुण्यकर्म करण्याची संधी मिळेल
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मागील काही दिवसांच्या तुलनेत अधिक आनंददायी राहू शकतो. कुटुंबासोबत मनोरंजक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या हातून एखादे पुण्यकर्म घडण्याची शक्यता आहे. राशीच्या चौथ्या स्थानात उच्चीचा चंद्र असल्यामुळे सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. आई आणि माहेरच्या नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. आवडीचे खाद्यपदार्थ खायला मिळाल्याने आनंद होईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमाचाही आनंद घेता येईल. मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीगाठींमुळे दिवस आनंदात जाईल.

मीन रास : आर्थिक परिस्थिती सामान्य राहील
मीन राशीच्या व्यक्तींनी आज जोखमीची कामे करण्यापासून दूर राहावे, असा सल्ला दिला जात आहे. तिसऱ्या स्थानातील चंद्र आणि राशीतील शनीचे गोचर यामुळे जुन्या दुखापतीचा त्रास पुन्हा जाणवू शकतो. ओल्या जमिनीवरून चालताना काळजी घ्या. वाहन चालवताना निष्काळजीपणा टाळा. आर्थिक परिस्थिती आज सामान्य राहण्याची शक्यता आहे. विजेची उपकरणे किंवा वाहनांवर खर्च करावा लागू शकतो. विरोधकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. धाडस दाखवण्याच्या नादात नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. भाऊ-बहिणींसोबत वाद होणार नाहीत, याची दक्षता घ्या. शेजाऱ्यांकडून अपेक्षित मदत मिळू शकते.

follow us