शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला नेहमीच डॉक्टरांकडून जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात ही गरज जास्त असते, कारण उष्णतेमुळे आपल्या शरीरात असणारे पाणी हे घामाच्या स्वरूपाने बाहेर पडते. डॉक्टरांच्या मते प्रौढ व्यक्तींनी दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे हायड्रेशन होण्यापासून मदत होते आणि आपल्या अवयवांचे कार्य सुद्धा सुरळीत चालते.
पाणी कमी प्यायल्याने डीहायड्रेशन होऊन त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात. जसे की, किडनी स्टोन, त्वचा कोरडी पडणे. पण या उलट जर तुम्ही जास्त पाणी पिलं तर तेही तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिले तर त्याचे दुष्परिणाम काय काय होऊ शकतात ते जाणून घेऊ या..
आपल्याकडील परिस्थतीनुसार पाणी पिण्याचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. वातावरण, व्यायाम, आरोग्याची स्थिती, गर्भधारणा यांसारख्या विविध परिस्थितीत शरीरासाठी पाण्याची गरज भिन्न असू शकते.
1. पाण्यातून विषबाधेची शक्यता
तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त पाणी पीत असाल तर तुम्हाला पाण्याची विषबाधा होऊ शकते. जास्त पाणी पिल्याने जास्त फिल्टरेशन होते. किडनीचे कार्य वाढून परिणामी तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स पातळ होऊ शकतात. उदाहरणार्थ जर सोडियम म्हणजेच शरीरातील मीठ हे पातळ झाले तर हायपोनेट्रेमिया विकसित होतो. शरीरात सोडियमची पातळी कमी असल्यामुळे तुमच्या पेशींमध्ये द्रव पदार्थ जाऊ शकतात ज्यामुळे जळजळ होऊ शकते.
2. हायपोनेट्रेमियाची लक्षणे काय?
सुरुवातीच्या टप्प्यात ओव्हरहायड्रेशन ची लक्षणे ओळखणे कठीण होऊ शकत. मात्र वारंवार लघवी होणे हे निश्चित याचं कारण मानलं जातं. पाण्याच्या विषबाधामुळे तुम्हाला हायपोनेट्रेमिया विकसित झाल्यास शरीराला विविध दुष्परिणामांचा धोका असतो.
– मळमळ आणि उलटी
– मेंदूवर दाब पडल्याने डोकेदुखी
– मानसिक स्थितीतील बदल जसे की गोंधळ किंवा दिशाभूल
– स्नायू पेटके
– वारंवार लघवीची समस्या
आपली किडनी हे एकावेळी किती पाणी फिल्ट्रेट करू शकते याची सुद्धा मर्यादा निश्चित आहे. संशोधकांच्या मते जास्तीत जास्त 800 ते 1000 मिलीलीटर प्रति तास इतके पाणी फिल्टर करण्याची आपल्या किडनीची क्षमता आहे. पण तुम्ही जर यापेक्षा जास्त पाणी पिण्यास सुरुवात केली तर किडनीला शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकणं कठीण होतं, ज्यामुळे तुम्हाला पोट फुगणे आणि मळमळण्याची समस्या उद्भवू शकते.
Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?