Car Sales : लक्झरी कार कंपन्याचा विक्रीचा विक्रम; ऑडीसह ‘या’ कारची रोखीने खरेदी
मुंबई : कोविडनंतर जगात आर्थिक विषमतेचे नवे पर्व सुरू होताना दिसत आहे. (India) गरीब लोक पूर्वीपेक्षा गरीब होत असताना श्रीमंतांची संपत्ती अनेक पटींनी वाढत आहे. (Lamborghini ) आलिशान गाड्यांच्या विक्रीत झालेली वाढ हे याचे सर्वात मोठे उदाहरण राहणार आहे. (Porsche) जगातील बहुतेक लक्झरी कार कंपन्यांनी 2021 मध्ये विक्रमी विक्री नोंदवली. (Porsche IndiaLuxury) हा ट्रेंड 2022 मध्येही तसाच कायम राहिला.
लॅम्बोर्गिनीची सर्वाधिक विक्री
सामान्य ऑटोमोबाईल कंपन्या आणि खरेदीदार, महाग कर्जे, वाढता घटक खर्च आणि पुरवठा साखळी या समस्यांनी त्रस्त असताना लक्झरी कार कंपन्यांनी पुन्हा एकदा विक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित केले. ब्रिटनच्या लक्झरी कार कंपनी बेंटलेने २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये ४ टक्के अधिक १५ हजार १७४ कार विकल्या. कंपनीसाठी ही विक्रमी विक्री राहिली आहे. बेंटलेने २०२१ मध्ये ३१ टक्के वाढीसह विक्रमी १४ हजार ६५९ कार विकल्या. २०२० मध्ये हा आकडा ११ हजार २०६ होता. आणखी एक लक्झरी ब्रँड लॅम्बोर्गिनीची विक्री गेल्या वर्षी १० टक्के वाढून ९ हजार २३३ वर पोहोचली.
पोर्शची विक्री ३ टक्के वाढून उत्तर अमेरिकेत विक्रमी विक्री झाली. रोल्स रॉयस (Rolls-Royce) ची विक्री ८ टक्के वाढून ६ हजार ०२१ कार झाली. रोल्स रॉयससाठी ग्राहक सरासरी ५ कोटी रुपये प्रति कार खर्च करतात. त्यापैकी बहुतेक लोकांकडे अगोदरच रोल्स रॉइस किंवा इतर कोणतीही आलिशान कार आहे.
रोखीने खरेदी
कोविड १९ नंतर गेल्या ३ वर्षांत आलिशान कार खरेदीसाठी रोख रकमेचा वापर झपाट्याने वाढला आहे. कॉक्स ऑटोमोटिव्हचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ जोनाथन स्मोक म्हणतात, गेल्या वर्षी अनेक श्रीमंत लोकांनी लक्झरी कार रोखीने विकत घेतल्या. यंदा हा कल नेहमीपेक्षा जास्त वाढण्याची अपेक्षा आहे. शेअर बाजारातील अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात प्रचंड पैसा असणारे लोक लक्झरी वस्तूंवर खर्च करत आहेत.
१ बेंटलेच्या किमतीत १०० एंट्री लेव्हल कार
लक्झरी कारच्या जगभरातील विक्रीचे आकडे भारतात एका महिन्यात विकल्या गेलेल्या कारपेक्षा कमी दिसतात. परंतु, आपण किंमत पाहिली तर ती कितीतरी पटीने जास्त असू शकते. बेंटले, लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉयस या कारची सरासरी किंमत सुमारे ४ कोटी रुपये आहे. म्हणजेच अशा आलिशान कारच्या किमतीत १०० एंट्री लेव्हल कार भारतात येऊ शकतात.