मेष आणि तूळ राशीसह अनेक राशींना आज ग्रहांच्या शुभ गोचराचा लाभ; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

horoscope मेष ते मीन या सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस कसा असेल, हे जाणून घेऊया.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, अक्षय्य तृतीयेला, या राशींना नशीब साथ देईल, त्यांना देवाचा आशीर्वाद मिळेल

Many zodiac signs will benefit from auspicious transit of planets today today’s horoscope : मेष ते मीन या सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस कसा असेल, हे जाणून घेऊया. आज २३ नोव्हेंबर, सोमवार. आज दिवसभर चंद्र मेष राशीत संचार करणार असून, संध्याकाळनंतर चंद्राचे वृषभ राशीत संक्रमण होईल. या काळात चंद्र भरणी आणि त्यानंतर कृत्तिका नक्षत्रातून मार्गक्रमण करेल. विशेष म्हणजे आज मंगळ आणि गुरूसोबत चंद्राचा नवम-पंचम योगही जुळून येत आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोणत्या राशीला लाभ होणार, कोणाला सावध राहावे लागणार आणि तुमच्या नशिबात आज काय आहे, जाणून घेऊया वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजचे राशिभविष्य.

मेष रास : कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल
मेष राशीच्या व्यक्ती आज सकाळपासूनच उत्साही आणि सक्रिय राहतील. तुमची कल्पकता आणि दूरदृष्टी यामुळे करिअरमध्ये लाभ मिळण्यासोबतच मान-सन्मानही वाढू शकतो. व्यवसायातील एखाद्या व्यवहारातून फायदा झाल्याने आनंद मिळेल. आज तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवातही करू शकता. कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. मुलांकडून मिळणाऱ्या आनंदामुळे मन समाधानी राहील. मात्र, आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. थकवा आणि सर्दीचा त्रास जाणवू शकतो.

वृषभ रास : आज व्यवसायात फायदा होईल
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा सोमवार काहीसा संथ राहण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत आळस आणि सुस्ती जाणवू शकते. जुन्या आर्थिक व्यवहारांमुळे आणि खर्चामुळे मनात संभ्रम निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. अन्यथा निराशा पदरी पडू शकते. व्यवसायात आज फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मन विचलित होण्याची शक्यता आहे. महिला सहकारी किंवा मैत्रिणीकडून मदत मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सहकार्य कायम राहील.

मिथुन रास : कामाचा ताण वाढणार
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा सोमवार जबाबदाऱ्यांमध्ये वाढ करणारा ठरू शकतो. कामाचा ताण अधिक राहील. वरिष्ठांकडून काही नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, राशीच्या अकराव्या स्थानात चंद्राचे गोचर होत असल्याने व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो. तसेच पाचव्या स्थानातील बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडवा वाढेल. आज एखादी भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. घरात मित्रमंडळी आणि पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. त्यामुळे कुटुंबात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील.

कर्क रास : सामाजिक कार्यातील सक्रियता वाढेल
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे मेष राशीतील गोचर लाभदायक ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकारी आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. बऱ्याच दिवसांपासून ज्या संधीची तुम्ही वाट पाहत आहात, अशी एखादी संधी आज मिळू शकते. सामाजिक कार्यातील तुमचा सहभाग आणि सक्रियता वाढेल. कौटुंबिक जीवनात वडील आणि काकांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना घरातील सदस्यांच्या मदतीने व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

सिंह रास : मेहनतीपेक्षा अधिक यश मिळेल
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहणार आहे. राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचे गोचर होत असल्याने तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. धार्मिक कार्य, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान या विषयांमध्ये तुमची आवड वाढेल. तांत्रिक ज्ञानाचा तुम्हाला फायदा होईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते.

कन्या रास : सामाजिक व्यवहारांवर खर्च होईल
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याचा पहिला दिवस मानसिक गोंधळाचा ठरू शकतो. विद्यार्थ्यांनी मनावर नियंत्रण ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अन्यथा अपेक्षित निकाल न मिळाल्याने निराशा होऊ शकते. आर्थिक बाबतीत आजचा दिवस खर्चिक ठरण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि सामाजिक व्यवहारांवर पैसे खर्च करावे लागू शकतात. वडिलांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात बुध आणि शुक्र यांच्या युतीचा फायदा होऊ शकतो. तुमच्या बोलण्यातील कौशल्य आणि चातुर्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास : अचानक धनलाभ होण्याची शक्यता
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. कुटुंबातील नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. नातेवाईकांच्या आगमनामुळे घरात आनंदी वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन आणि कार्यपद्धतीच्या जोरावर यश मिळवता येईल. आज अचानक कुठूनतरी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठीही आजचा दिवस अनुकूल असेल. जोडीदारासोबत बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळेल. नात्यातील प्रेम आणि जवळीक वाढेल. कपडे किंवा आवडीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा आनंद मिळू शकतो. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ उत्साहात जाईल. कुटुंबासोबत आवडीच्या जेवणाचा आनंद घेता येईल.

वृश्चिक रास : मेहनतीनंतर यश मिळेल
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याचा पहिला दिवस आरोग्याच्या दृष्टीने काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. सर्दी आणि तापाचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. योग आणि ध्यान केल्याने फायदा होईल. काही अनावश्यक खर्चांमुळे मानसिक ताण वाढू शकतो. शेजाऱ्यांसोबत वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. तुम्ही कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कामांमध्ये मात्र अधिक मेहनत घेतल्यानंतरच यश मिळेल. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा.

धनु रास : भागीदारांकडून सहकार्य मिळेल
धनु राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याचा पहिला दिवस अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर लाभ मिळवून देणारा ठरू शकतो. नशिबाची साथ मिळाल्याने कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. दिवसाचा पूर्वार्ध अधिक व्यस्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून कामे पूर्ण करा. आज एखादी आनंदाची बातमीही मिळू शकते. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना भागीदारांकडून चांगले सहकार्य मिळेल. मात्र, दिवसाच्या उत्तरार्धात आखलेला एखादा बेत पुढे ढकलला जाऊ शकतो.

मकर रास : संध्याकाळचा वेळ रोमँटिक राहील
मकर राशीच्या व्यक्तींना आज चंद्राच्या शुभ गोचराचा लाभ मिळू शकतो. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल आणि तुम्ही दिवसभर सक्रिय राहाल. सुख-सुविधांच्या वस्तू मिळवण्याची इच्छा वाढेल. आई किंवा घरातील एखाद्या ज्येष्ठ महिलेकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. कामानिमित्त केलेल्या प्रवासातून फायदा होण्याची शक्यता आहे. वाहनसुख मिळेल, मात्र वाहनावर खर्चही होऊ शकतो. वैवाहिक जीवनात दिवसभर काही किरकोळ मतभेद होण्याची शक्यता असली, तरी संध्याकाळचा वेळ रोमँटिक राहील. मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवता येतील.

कुंभ रास : खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने संमिश्र राहू शकतो. शरीरात आळस आणि सुस्ती जाणवण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या मित्राला किंवा सहकाऱ्याला मदत करण्याची वेळ येऊ शकते. मात्र, संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ आनंददायी आणि रोमँटिक राहील. जोडीदारासोबतचे नाते सुधारण्यासाठी तुम्हाला चांगली संधी मिळू शकते.

मीन रास : जुनी समस्या पुन्हा डोके वर काढू शकते
मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. दिवसभर कामाचा ताण जाणवू शकतो. एखादी जुनी समस्या पुन्हा त्रास देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा काळ मात्र अनुकूल राहील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. शिक्षणाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. दूर राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकाकडून आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच आज एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

follow us