औषधी तुळस ठरेल चेहऱ्यासाठी वरदान; जाणून घ्या फायदे

Untitled Design (93)

मुंबई : आपण आपल्या अंगणात घरात तुळशीचे रोप पाहिले असतील. धार्मिक गोष्टींमध्ये तुळशीचे पूजन केले जाते. तुळस ही सदाहरित असेल तर घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते. आजवर आयुर्वेदात तुळशीचे अनेक फायदे सांगितले आहे. औषधी वनस्पती म्हणून तिच्याकडे पहिले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला तुळस ही चेहऱ्यावरील अनेक समस्यांवर उपाय म्हणून कशी काम करते हे सांगणार आहोत. तुळशीचे पान तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्यात भर घालण्याचे काम करते. ते कसे तेच आपण जाणून घेऊ

तुळशीच्या पानाचा फेसपॅक हा चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर व प्रभावी ठरतो. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की तुळशीचा फेसपॅक नेमका बनवायचा कसा? तर आज आम्ही तुम्हाला काही सोपी पद्धत सांगत आहोत ज्याच्या साह्याने तुम्ही घरच्या घरी हा फेसपॅक बनवू शकाल.

काळजी घ्या…नव्या व्हायरसवर उपचार नाही; खबरदारी हाच उत्तम पर्याय!

फेसपॅक तयार करण्याची पद्धत
तुळशीच्या पानांचा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला 25 ते 30 तुळशीची पाने घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर 25 ते 30 कडुलिंबाची पाने देखील घ्या. ही दोन्ही पाने चांगले बारीक करून पेस्ट बनवा आणि नंतर एक चमचा मध घाला. हे सर्व निट मिक्स करुन घ्या. हा तुळशीच्या पानांचा फेसपॅक तुम्हाला चेहऱ्यावर 10 मिनिटे लावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवा.

नगरकरांनो लक्ष द्या ! पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात झाला बदल…

जाणून घ्या या फेसपॅकचे फायदे
तुळशीच्या पानांपासून तयार केला हा फेसपॅक हा नैसर्गिक क्लींजर आहे. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील त्वचेवरील धूळ निघून जाते आणि त्वचा स्वच्छ होते. नितळ त्वचेसाठी हा फेसपॅक अत्यंत उत्तम मानला जातो. तरुण वयात अनेकांना पिंपल्सची समस्या उद्भवते. मात्र यावर टेन्शन घेण्याची गरज नाही कारण तुळशीच्या पानांपासून तयार केलेल्या फेसपॅकमुळे पिंपल्स निघून जाण्यास मदत होते. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकते.

Tags

follow us