पूर्व रेल्वेत ३१०० जागांसाठी मेगाभरती, दहावी पास आणि आयटीआय उमदेवार करू शकतात अर्ज

  • Written By: Published:
पूर्व रेल्वेत ३१०० जागांसाठी मेगाभरती, दहावी पास आणि आयटीआय उमदेवार करू शकतात अर्ज

Eastern Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या (Apprentice) एकूण ३१०० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने बेरोजगार तरुणांसाठी विविध शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

भारतीय रेल्वे ही सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वे ही जगातील चौथी मोठी रेल्वे सेवा आहे. 12.27 लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारी संख्येत जगातील आठवी सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे. रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग, भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्याचं नियोजन करतो. रेल्वे खात्याचं कामकाज कॅबिनेट दर्जाचे रेल्वे मंत्री पाहतात आणि रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.

एवढ्या मोठ्या अवाढव्य रेल्वेचा पसारा पाहता त्यासाठी कुशल आणि अकुशल कर्चचाऱ्यांची गरज असते. तांत्रिक ज्ञान असणाऱ्यांना विशेष मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन पूर्व रेल्वेने तीन हजारांहून अधिक शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी बुधवार, २७ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर आहे.

MPSC Chairman : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी दिलीप पांढरपट्टे यांची नेमणूक ! 

आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या भरतीचा लाभ मिळणार आहे. टर्नर, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), इलेक्ट्रिशियन, पेंटर, सुतार, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, मेकॅनिक (डिझेल), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि मेकॅनिक (मोटर व्हेईकल) या ट्रेडमधील उमेदवार विविध पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराचे कमाल वय २४ वर्षांच्या दरम्यान असावे. नियमानुसार मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे.

उमेदवाराने 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे आणि NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. इच्छुक उमेदवार rrcer.com या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube