खुशखबर! जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार पदांची भरती, कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा

खुशखबर! जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार पदांची भरती, कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा

मुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद (Jilha Parishad recrutment) भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गट क संवर्गातील तब्बल 19 हजार पदांच्या जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती ग्रामविकास विभागांतर्गत केली जाणार असल्याचं ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितलं. (Mega recruitment of 19 thousand 460 posts of Group C posts in Zilla Parishads)

महाजन यांनी सांगितले की, सर्व जिल्हा परिषदांतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागातील 100 टक्के आणि इतर विभागातील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेनं भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये गट-क मधील 30 संवर्गातील एकूण 19,460 पदे भरण्याची जाहिरात 5 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ते म्हणाले, खूप दिवसांपासून अनेक तरुणाचे मला फोन यायचे. तीन-चार वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. याआधी या भरतीचे फॉर्मही सुटले होते. मात्र, या भरतीला स्थगिती आली होती. झेडपीमधील गट-क मधील 18 संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी मार्च 2019 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर अनेक कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळं हजारो उमेदावारांमध्ये नाराजी पसरली होती. आता शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ही मेगा भरती ग्रामविकास विभागांतर्गत करण्यात येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.

अधिवेशनाची सांगता! अजितदादा म्हणाले, सुरुवातीला चहापानावर बहिष्कार पण शेवटच्या.., 

05 ते 25 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2023 पर्यंत त्यांना ज्या जिल्हा परिषदेसाठी अर्ज करायचा आहे त्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. गिरीश महाजन म्हणाले की, रिक्त पदे, पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि इतर आवश्यक अटी व शर्ती आदी तपशील संबंधित वेबसाईटवर उपलब्ध असतील.

उमेदवाराने विनाकारण अधिक जिल्हा परिषदांमध्ये त्याच पदासाठी अर्ज करू नये. कारण एकाच कालावधीत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये पोस्टनिहाय संगणकीकृत परीक्षा घेतली जाईल. असे केल्यानं उमेदवारांना अर्जाच्या शुल्कापोटी अनावश्यक खर्च होऊ शकतो. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्र संगणकीकृत प्रणालीद्वारे तयार केले जाणार आहे. उमेदवाराने एकाच संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केला असेल आणि परीक्षा प्रवेशपत्रानुसार उमेदवाराला इतर कोणत्याही ठिकाणी परीक्षेचा क्रमांक मिळेल. त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.

दरम्यान, ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या या भरतीतून १९- २० हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. ही भरती टीसीएस मार्फत होणार आहे. यात गडबड होणार नसल्याचं महाजन यांनी सांगितलं.

जिल्हानिहाय जागा-
अहमदनगर-937, पालघर 991, अकोला-284, औरंगाबाद-432, अमरावती-653, जळगाव-626, कोल्हापूर-728, नागपूर-557
नाशिक-1038, सांगली- 754, ठाणे-255

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube