National Technology Day : ‘मिसाईल मॅन’ कलाम यांनी पोखरण गाजवलं अन् वाजपेयींनी केली मोठी घोषणा

  • Written By: Published:
National Technology Day : ‘मिसाईल मॅन’ कलाम यांनी पोखरण गाजवलं अन् वाजपेयींनी केली मोठी घोषणा

National Technology Day : तंत्रज्ञानाच्या विकासाचे महत्त्व आणि समाजातील योगदान लक्षात घेऊन दरवर्षी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन (National Technology Day) साजरा केला जातो. भारतीय दृष्टिकोनातून या दिवसाचे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी म्हणजे 11 मे 1998 रोजी पोखरणमध्ये अणुचाचणी यशस्वीपणे पार पडली होती. हा दिवस केवळ अणु तंत्रज्ञानातील भारताच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठीच नाही तर, इतर अनेक तांत्रिक क्षेत्रात देशाची प्रगती ओळखण्यासाठीही साजरा केला जातो. या दिवसाचा इतिहासाबद्दल जाणून घेऊया…(National Technology Day History)

सावधान..! पृथ्वीवर धडकणार सौर वादळ; जगभरात मोठ्या नुकसानीची भीती

पोखरण चाचणी यशस्वी झाली अन्…

11 मे 1998 रोजी पोखरणमध्ये अणुचाचणी यशस्वीपणे पार पडली होती. यानंतर, भारताचा समावेश अणुऊर्जा असलेल्या देशांच्या यादीत करण्यात आला, तेव्हापासून भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये करिअर करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो.

SBI Recruitment : स्टेट बॅंकेची मोठी घोषणा! 12 हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती..

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचा इतिहास काय?

भारतीय सैन्याने राजस्थानमध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihar vajpayee) यांच्या देखरेखीखाली 11 मे 1998 रोजी (पोखरण-II) पाच अणुबॉम्ब यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. पोखरण-II चे नेतृत्व ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळख असलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले होते. पोखरण चाचणीच्या मोठ्या यशानंतर भारत सहावा आण्विक देश बनला आणि भारत अणुशक्ती असलेल्या देशांमध्ये सामील झाला. त्यानंतर अणुविज्ञान क्षेत्रातील भारताची कामगिरी संपू्र्ण देशाला साजरी करता यावी यासाठी आणि तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केला. 11 मे 1999 रोजी पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला होता.

पोखरणनंतर भारतीय शास्त्रज्ञांची ‘हंसा 3’ भरारी

पोखरणच्या यशस्वी चाचणीनंतर भारताचा समावेश अणुशक्ती असलेल्या देशांमध्ये सामील झाला. मात्र, भारत एवढ्या यशावरच न थांबता पुढे चालत राहिला आणि 11 मे 1999 रोजी भारतीय शास्त्रज्ञांनी पहिले स्वदेशी विमान “हंसा III” बेंगळुरू येथे यशस्वीपणे उडवले. तसेच याच दिवशी त्रिशूल क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणीही करण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube