व्हाट्सअ‍ॅप कडून युजर्ससाठी नवे फीचर्स; पहा तुमच्यासाठी काय नवीन

  • Written By: Last Updated:
व्हाट्सअ‍ॅप कडून युजर्ससाठी नवे फीचर्स; पहा तुमच्यासाठी काय नवीन

दिल्ली : व्हाट्सअ‍ॅप हे जगातील सर्वाधिक वापर होत असलेले मेसेजिंग अप आहे. आपल्या युजर्ससाठी व्हाट्सअ‍ॅप दरवर्षी काही नवीन फीचर्स आणत असते. मागच्या वर्षी कम्युनिटी फीचर्ससह काही फीचर्स व्हाट्सअ‍ॅपने आणले होते. यावर्षीही व्हाट्सअ‍ॅपकडून काही नवीन फीचर्स आणण्याची घोषणा केली आहे.

हे असतील व्हाट्सअ‍ॅपचे नवीन फीचर्स

डेस्कटॉप कॉल टॅब

काही वर्षांपासून व्हाट्सअ‍ॅपची कॉल सर्विस मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे व्हाट्सअ‍ॅप आता डेस्कटॉपवरही कॉल टॅब हे फीचर्स आणू शकते. युजर्स मोबाईल आणि वेब अ‍ॅप्लिकेशन्ससह व्हाट्सअ‍ॅप कॉल्सचा डेटा ट्रॅक करू शकतात.

टेक्स्ट वन व्ह्यू

सध्या इमेजसाठी वन व्ह्यू हे फीचर मोठे चर्चेत आहे. अनेक युजर्स इमेज व्ह्यू -वन्स फिचर वापरतात. टेक्स्ट वन व्ह्यू हे इमेज वन व्ह्यू प्रमाणेच काम करेल फक्त ते टेक्स्ट साठी असेल. हे फिचर युजर्सचे मेसेजेस खासगी आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.

व्हिडिओ कॉलवेळी इतर अ‍ॅप्लिकेशन वापरता येणार

या फीचरमुळे युजर्स व्हाट्सअ‍ॅप कॉल चालू असताना इतर अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करू शकणार आहेत. या फिचरमुळे युजर्सना व्हिडीओ कॉलची विंडो मिनिमाईज करून इतर अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करता येईल. हे फिचर अँड्रॉइड युजर्ससाठी आधीपासून असून आता ते iOS युजर्ससाठी लाँच केले जाईल.

व्हाट्सअ‍ॅप एकाचवेळी अनेक ठिकाणी वापरता येणार

सध्या युजर्सना व्हाट्सअ‍ॅपमध्ये एकावेळी दोन सर्व्हिसेस किंवा अनेक डिव्हाइसवर एकच अकाउंट वापरता येत नाही. मात्र या नवीन फीचरमुळे युजर्सना त्यांचा डेटा लिंक आणि करण्याचा ऑप्शन मिळेल. अनेक डिव्हाइसवर सेम प्रोफाइल व्हाट्सअ‍ॅप वापरता येईल. हे एकाच वेळी अँड्रॉइड आणि iOS वर युजर्सना वापरता येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube