कृषी सेवक पदांच्या 255 जागांसाठी भरती, पगार 16,000 रुपये प्रतिमाह

कृषी सेवक पदांच्या 255 जागांसाठी भरती, पगार 16,000 रुपये प्रतिमाह

ठाणे कृषी विभागाने (Thane Agriculture Department) कृषी सेवक (Krushi sevak) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. कृषी विभागाने या भरतीसाठी पात्र उमेदवारांना https://krushi.maharashtra.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे कृषी विभाग भरती मंडळ, ठाणे यांच्या ऑगस्ट 2023 च्या जाहिरातीनुसार, ही भरती एकूण 255 पदांसाठी असेल. या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून त्यात आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

पदाचे नाव – कृषी सेवक.

एकूण रिक्त पदे – 255

शैक्षणिक पात्रता –
शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी विषयातील पदवी किंवा समतुल्य
निवड झालेल्या उमेदवारांची कृषी सेवक पदी प्रथमत एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल. व त्यांचे काम समाधानकारक असल्यास पुढील 2 वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल.

वयोमर्यादा-
खुला प्रवर्ग – 19 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय – 19 ते 43 वर्षे.
दिव्यांग उमदेवार – 45 वर्षापर्यंत शिथीलक्षम
प्रावीण्य प्राप्त खेळाडू उमेदवार – 43 वर्षापर्यंत शिथीलक्षम
माजी सैनिक उमेदवार – सैनिक सेवेच कालावधी अधिक 3 वर्ष
विकलांग माजी सैनिक उमेदवार – 45 वर्षापर्यंत शिथीलक्षम

‘एक ना एक दिवस शरद पवार मोदींचंच नेतृत्व..,’; चंद्रशेखर बावनकुळेंचा उपरोधिक टोला 

निवड प्रक्रिया – परीक्षा.

ही परीक्षा एकूण 140 मार्काची असेल. त्यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौध्दीक चाचणी यावर वीस प्रश्न विचारले जातील. तर कृषी विषयावर 60 प्रश्न विचारले जातील.

परीक्षा शुल्क –
खुला वर्ग – रु.1000.
आरक्षित श्रेणी – रु.900.
परीक्षा शुल्क ना-परतावा आहे.

नोकरीचे ठिकाण – ठाणे.

पगार – निश्चित वेतन रुपये 16000 रुपये प्रतिमाह

अधिकृत वेबसाईट –

https://krishi.maharashtra.gov.in/

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख अद्याप उपलब्ध नाही.

जाहिरात-
https://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/Thane%20Division%20ads-2.pdf

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube