खुशखबर! महावितरणमध्ये या २६ पदांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज

खुशखबर! महावितरणमध्ये या २६ पदांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज

Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. या कंपनीत काम करण्याची आता उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.  कारण महावितरण अंतर्गत एकूण 26 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही उणीवा असल्यास किंवा दिलेल्या तारखेनंतर  अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज फेटाळण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. (Recruitment for 26 posts in Mahavitaran last date for apply 27 july)

या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा, 10वी, 12वी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, परवाना) आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करणं आवश्यक आहे.  या पदासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार भरती आणि वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. त्याची सविस्तर माहिती अधिसूचनेत दिली आहे.

एकूण पदांची संख्या– 26

पदाचे नाव – मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, महाव्यवस्थापक, जे.टी. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक. जनरल मॅनेजर

शैक्षणिक पात्रता –
मुख्य अभियंता – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी.
अधीक्षक अभियंता – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी.
महाव्यवस्थापक – CA/ICWA अंतिम उत्तीर्ण
जे.टी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी – पदवी किंवा डिप्लोमा
उपमहाव्यवस्थापक – पदवी किंवा पदविका
सहाय्यक महाव्यवस्थापक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी CA/ICWA अंतिम उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्रात

.. तेव्हा भाजपसोबत काय घडलं? पवारांची साथ सोडताच भुजबळांनी सगळंच सांगितलं
पोस्टनिहाय वयोमर्यादा –
मुख्य अभियंता (जि.) – 50 वर्षे.
महाव्यवस्थापक (F&A) – 48 वर्षे
अधीक्षक अभियंता (जिल्हा)/Jt. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी/उपमहाव्यवस्थापक (एचआर)/सहाय्यक. महाव्यवस्थापक (HR)/सहायक. – महाव्यवस्थापक (F&A) – 45 वर्षे

अर्जाचे शुल्क –
खुला श्रेणी-708 (CGST आणि SGST सह).
आरक्षित – 354 (CGST आणि SGST सह).

अर्जाची पद्धत – ऑफलाइन.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
मुख्य महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, 4था मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – 51

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in

जाहिरात – https://drive.google.com/file/d/19Z0TfTk1dtRZkxU2bKDbf2YCTz_v1LGR/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube