.. तेव्हा भाजपसोबत काय घडलं? पवारांची साथ सोडताच भुजबळांनी सगळंच सांगितलं
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल येवल्यातच पहिली सभा घेत भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भुजबळांवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज भुजबळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
पवारांनीच भाजप-सेनेत फूट पाडली
2019 मध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. निवडणुकीनंतर भाजपबरोबर जाण्याचं ठरलं होत. त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर भाजप आणि सेनेत वाद झाले. त्यावेळी भाजपने विचारलं होतं आम्ही शिवेसेनेला सोडतो तुम्ही येणार का, होकार मिळाल्यानंतरच भाजपने शिवसेनेला सोडले. या ठिकाणी मी कुठेच नव्हतो. मला कधीही पवार साहेबांनी कधी कोणत्या चर्चेला पाठवलं नाही.
2014 मध्ये भाजपने शिवसेनेची साथ सोडली. तेव्हा पवारांनी भाजपला सांगितलं होतं की, तुम्ही शिवसेना सोडली की आम्ही काँग्रेसला सोडू. काही महिन्याने आम्ही भाजप सरकारमध्ये येऊ. नंतर शरद पवार यांनी अचानक सांगितलं की आमचा पाठिंबा गृहीत धरू नका. त्यानंतर फडणवीस यांनी शिवसेनेला सोबत घेत सरकार स्थापन केलं, असा मोठा खुलासा भुजबळ यांनी केला.
Chhagan Bhujbal : ‘बंड मी घडवलं नाही, ते तर तुमच्या घरात झालं’; भुजबळांचं पवारांना प्रत्युत्तर
मीच येवल्याची निवड केली
मला येवला मतदारसंघ का दिला याचा पवार साहेबांना विसर पडल्याचे दिसते. 2004 मध्ये माझ्यासाठी एरंडोल, जुन्नर, वैजापूर, येवला हे चार पर्याय होते. वडिलांचे गाव असल्याने मला जुन्नरमधून लढायचे होते. पण, कार्यकर्त्यांनी आग्रह केल्याने जुन्नर ऐवजी येवल्यातून लढलो. येवला मागासलेले असल्याने येथे विकासकामे करण्याची संधी होती. त्यामुळे मीच येवला मतदारसंघाचा आग्रह धरला होता. येथे संघर्ष केला. येथील जनतेनं मला प्रेम दिले असे स्पष्ट करत त्यांनी पवारांचा दावाही खोडून काढला.
मी चार वेळा शिवसेनेच्या उमेदवारांना पाडलं
राऊत यांनी काल पंढरपुरात छगन भुजबळ यांना आगामी निवडणुकीत पराभूत करणार असल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावर भुजबळ म्हणाले, मी चार वेळा शिवसेनेच्या उमेदवारांना पाडलं. कुठं काय बोलता आधी तुम्ही निवडून तर या असे प्रतिआव्हान राऊत यांना दिले.
उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर! संजय राठोडांच्या बालेकिल्ल्यातून धडाडणार तोफ
साहेब, कुठे-कुठे माफी मागणार ?
काल येवल्यात येऊन तुम्ही माफी मागितली. पण कशासाठी माफी? आणि गोंदियापासून ते कोल्हापूरपर्यंत कुठे कुठे माफी मागणार आहात? 50 ठिकाणी माफी मागणार का? सुरुवात तुमच्या घरातून झाली होती. ज्यांंना तुम्ही 60-62 वर्ष संभाळलं त्यांनी पुढाकार घेतला. ते आता उपमुख्यमंत्री आहेत. असं म्हणतं मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं.