Chhagan Bhujbal : ‘बंड मी घडवलं नाही, ते तर तुमच्या घरात झालं’; भुजबळांचं पवारांना प्रत्युत्तर
Chagan Bhujbal replies Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड केलं. पण, या बंडामागे छगन भुजबळांचा हात आहे अशी चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल येवल्यातच पहिली सभा घेत भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या रणनितीला आज स्वतः छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेत रोखठोक उत्तरे दिली.
शरद पवारांना वाटतं हे बंड भुजबळांनी घडवून आणलं पण, त्यांचा हा समज चुकीचा आहे. 2014 मध्ये भाजपने शिवसेनेची साथ सोडली. तेव्हा पवारांनी भाजपला सांगितलं होतं की, तुम्ही शिवसेना सोडली की आम्ही काँग्रेसला सोडू. काही महिन्याने आम्ही भाजप सरकारमध्ये येऊ. नंतर शरद पवार यांनी अचानक सांगितलं की आमचा पाठिंबा गृहीत धरू नका. त्यानंतर फडणवीस यांनी शिवसेनेला सोबत घेत सरकार स्थापन केलं, असा मोठा खुलासा भुजबळ यांनी केला.
‘मी चार वेळा शिवसेनेच्या उमेदवारांना पाडलं, आधी निवडून तर या’; भुजबळांचं राऊतांना उत्तर
शरद पवार साहेब तुम्ही येवल्याला का आलात, हे मला कळलंच नाही. मी ओबीसी आहे, म्हणून आलात का, अहो, हे बंड मी घडवून आणलेलं नाही, ते तुमच्या घरातूनच सुरू झाले. प्रफुल्ल पटेल हे त्यांचे सहकारी आहेत. अजित पवार त्यांच्या घरातले आहेत. दिलीप वळसे पाटील हे त्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांचे सहाय्यक राहिले आहेत. वळसे पाटील यांच्या मतदारसंघात बैठक ठरली होती. तिथे पवार साहेब गेले नाहीत. मात्र, येवल्याला आले त्याचे वाईट वाटते, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.
2019 मध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. निवडणुकीनंतर भाजपबरोबर जाण्याचं ठरलं होत. त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर भाजप आणि सेनेत वाद झाले. त्यावेळी भाजपने विचारलं होतं आम्ही शिवेसेनेला सोडतो तुम्ही येणार का, होकार मिळाल्यानंतरच भाजपने शिवसेनेला सोडले. या ठिकाणी मी कुठेच नव्हतो. मला कधीही पवार साहेबांनी कधी कोणत्या चर्चेला पाठवलं नाही. असे असतानाही तुम्हीच सर्व काही केलं म्हणून मला का दोष देता, असा सवाल भुजबळ यांनी या पत्रकार परिषदेतून शरद पवार यांना विचारला.
अजितदादा की शरद पवार? आशुतोष काळेंचं ठरलं! थेट अमेरिकेतून केला निर्णय जाहीर
मी चार वेळा शिवसेनेच्या उमेदवारांना पाडलं
राऊत यांनी काल पंढरपुरात छगन भुजबळ यांना आगामी निवडणुकीत पराभूत करणार असल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावर भुजबळ म्हणाले, मी चार वेळा शिवसेनेच्या उमेदवारांना पाडलं. कुठं काय बोलता आधी तुम्ही निवडून तर या असे प्रतिआव्हान राऊत यांना दिले.