रेल्वेत EXAM न घेताच भरल्या जाणार ‘या’ पदांच्या जागा, महिन्याला मिळणार गल्लेगठ्ठ पगार

रेल्वेत EXAM न घेताच भरल्या जाणार ‘या’ पदांच्या जागा, महिन्याला मिळणार गल्लेगठ्ठ पगार

Vacancy For Junior Technical Associate post : भारतीय रेल्वेचं (Indian Railways) जाळं हे देशाच्या प्रत्येक कानोकोपऱ्यात जाऊन पोहोचलं आहे. दररोज शेकडोच नाही, तर लाखो प्रवासी हे रेल्वेतून आपला प्रवास करतात. रेल्वेचा हा अवाढव्य पसारा सांभाळण्यासाटी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) मनुष्यबळाची गरज असते. त्यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रिया करत असते. तुम्हीही रेल्वेत नोकरी मिळण्याच्या शोधात असाल तर तुम्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण मध्य रेल्वेने (South Central Railway) ज्युनियर टेक्निकल असोसिएटच्या पदांच्या (Junior Technical Associate) नुकतीच एक जाहिरात प्रसिध्द केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 जून 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना आपला अर्ज हा ऑफलाइन पध्दतीने करावा लागणार आहे. नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर त्यांना त्यांचे अर्ज पाठवावे लागणार आहेत. (Recruitment for 35 Vacancy For Junior Technical Associate posts in South Central Railway)

या भरती प्रक्रियेत एकूण 35 पदांची भरती करायची आहे. उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट scr.indianrailways.gov.in या संकेतस्तळावरून अर्ज डाउनलोड करू शकतात.

शैक्षणिक पात्रता काय?
ज्युनियर टेक्निकल असोसिएट (वर्क्स) (कॉन्स्टंट/ओएल) – या पदासाठी, उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापिठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये चार वर्षाची बॅचलर डिग्री किंवा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षाची बीएससीची डिग्री असणे आवश्यक आहे.

ज्युनियर टेक्निकल असोसिएट इलेक्ट्रिकल ड्राईंग कॉन्स्टंट/ओएल) – पदासाठी मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये चार वर्षांची बॅचलर पदवी असावी किंवा तीन वर्षांचा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग मधील डिप्लोमा असावा.

जिंतूर परभणी रोडवर दारूचा ट्रक पलटी, जखमीला मदत करण्याचं सोडून लोकांनी पळवले दारूचे बॉक्स

ज्युनियर टेक्निकल असोसिएट एस अँड टी (ड्रॉइंग) (कॉन्स्टंट/ओएल) – पदासाठी उमेदवाराकडे (ए) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेक्नॉलॉजी / कम्युनिकेशन इंजिनीअरिंग / कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनीअरिंगची डिग्री असावी. किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ साठी कोणत्याही शाखेतील पदवी / इलेक्ट्रॉनिक्स / माहिती तंत्रज्ञान / संप्रेषण अभियांत्रिकी / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकीची पदवी असावी.

वय श्रेणी
UR – 18-33 वर्षे
OBC – 18-36 वर्षे
SC/ST – 18-38 वर्षे

अर्ज फी
अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/महिला/अल्पसंख्याक/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 250
इतर उमेदवारांसाठी रु 500 अर्ज फी

निवड कशी होणार-
शिक्षण – 55 गुण
अनुभव – ३० गुण
व्यक्तिमत्व / बुद्धिमत्ता – 15 गुण

जाहिरात –
https://scr.indianrailways.gov.in/uploads/files/1685961214725-JTA_Notifn2023.pdf

अर्ज कुठं पाठवायचा?
पात्र आणि इच्छुक उमेदवार आपले अर्ज ‘द प्रिन्सिपल चीफ पर्सोनेल ऑफिसर सेक्रेटरी आणि सीनियर पर्सोनेल ऑफिसर (इंजिनीअरिंग), प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी कार्यालय, 4था मजला, कार्मिक विभाग, रेल्वे निलयम, दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद, पिन-500025 या पत्त्यावर पाठवू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 30 जून
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : scr.indianrailways.gov.in

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube