ITBP मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांच्या 458 जागांसाठी भरती; 10 वी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज, पगार 69,100
Indo-Tibetan Border Police Force job 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात (Indo-Tibetan Border Police Force) मोठी भरती केली जाणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले. ही भरती कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) या पदांसाठी होणार आहे. ITBP मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या (Constable Driver) 458 पदांवर भरती केली जाईल. अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज 27 जूनपासून सुरू होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार हे 27 जुलै 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. (Recruitment for 458 Posts of Constable Driver in ITBP; 10th passed candidates can also apply)
वयोमर्यादा, अर्ज फी, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत याविषयी सविस्तर माहिती इथे दिली आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमदेवार itbpolice.nic.in या संकेतस्थळाही भेट देऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रसिद्ध झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच आपला अर्ज भरावा. कारण अर्जात कोणतीही त्रुटी राहिल्यास अर्ज बाद होईल, याची उमदेवारांनी नोंद घ्यावी.
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) ग्रुप सी
एकूण पदे – 458
पदांचा तपशील
ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2023 अंतर्गत सामान्य श्रेणीसाठी 195 पदे, OBC साठी 110 पदे, EWS साठी 42 पदे, SC साठी 74 पदे आणि ST साठी 37 पदे ठेवण्यात आली आहेत. एकूण 458 रिक्त पदे या भरतीद्वारे भरली जाणार आहेत.
वयोमर्यादा
ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2023 साठी किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे आहे. या भरतीमधील वय 26 जुलै 2023 हा आधार मानून मोजला जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत दिली जाईल.
Marathi Theater Council: नाट्यगृहांना येणार अच्छे दिन; CM शिंदेंनी जाहीर केली एक खिडकी योजना
शैक्षणिक पात्रता
ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2023 साठी पात्रता निकष 10वी पास आहे. यासोबतच उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना असावा.
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
आवश्यक कागदपत्रे –
10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
जात प्रमाणपत्र (ओबीसी उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना)
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
अर्ज फी –
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 100 रुपये शुल्क असून एससी, एसटी या उमदेवारांना अर्ज करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
नोकरीचे ठिकाण– संपूर्ण भारत
पगार – 21700 रुपये ते 69100 रुपये (लेव्हल 3 पर्यंत पगा मिळणार आहे)
निवड कशी होईल?
शारीरिक क्षमता चाचणी (PET)
शारीरिक मानक विश्रांती (PST)
लेखी परिक्षा
कागदपत्रे पडताळणी
वैद्यकीय चाचणी
ITBP भरतीसाठी अर्ज कसा करावा
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
ITBP Driver Recruitment 2023 वर क्लिक करा.
त्यानंतर ITBP कॉन्स्टेबल ड्रायव्हर भर्ती 2023 ची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
Apply Online वर क्लिक करा.
त्यानंतर उमेदवाराने अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
शेवटी अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर सबमिट करा.
यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
अधिकृत वेबसाईट – www.itbpolice.nic.in/
जाहिरात – https://drive.google.com/file/d/1P-NJnIbWnp_E04-ip-ZXjd3LNZEwuJMQ/view