Goverment job : शासकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदासाठी भरती, थेट मुलाखत

Goverment job : शासकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदासाठी भरती, थेट मुलाखत

शासकीय महाविद्यालयांमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. शासकीय ज्ञान व विज्ञान महाविद्यालय (Government College) छत्रपती संभाजी नगर इथं लवकरच काही रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिव्याख्याता,  सहायक प्राध्यापक (Assistant Professor) या पदांसाठी ही भरती होणार आहे. सदर भरती अंतर्गत होणार नियुक्ती तासिका तत्वावर आणि तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रे आणि सत्यप्रतीसह दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला हजर राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 असणार आहे. (Recruitment for the post of Professor in Government College Aurangabad)

https://www.youtube.com/watch?v=T_PO8NAs7kE

कोणत्या विषयांसाठी होणार भरती?
कनिष्ठ विभाग – मराठी, हिंदी, संस्कृत, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, भूगोल, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, शारिरीक निर्देशक, वनस्पती शास्त्र गृहविज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, प्राणीशास्त्र, इलेक्ट्रॉनिक
वरिष्ठ विभाग- हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, संगीत, गृहविज्ञान, शारीरिक शिक्षण संचालक, संगणकशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, सुक्ष्मजिवशास्त्र, रसायनशास्त्र

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अधिव्याख्याता –  अधिव्याख्यात पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराचे  B.Ed/ MP.Ed/ BP.Ed/ PG पदवीसह संबंधित विषयातील PG पर्यंतचं शिक्षण आवश्यक आहे.
सहाय्यक प्राध्यापक – नेट/सेटसह संबंधित विषयातील पीजी पदवी, पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण.
पदवी परिक्षेत खुल्या प्रवर्गासाठी किमान ५५ टक्के व राखीव प्रवर्गासाठी ५० टक्के गुण आवश्यक. याशिवाय, युजीसी नेट, किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

Karnataka Politics : पराभवानंतर भाजपाचा टॉप गिअर; थेट केंद्रीय मंत्र्यांनाच धाडले राज्यात
आवश्यक कागदपत्रे
बायोडेटा, 10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना), पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

नोकरीचे ठिकाण – छत्रपती संभाजी नगर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख –  ११ जुलै २०२३

मुलाखतीचा पत्ता –
शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदार गेस्ट हाऊस जवळ, फोर्ट आर्च, छत्रपती संभाजी नगर 431004.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फोन नं. आणि संकतेस्थळ – ०२४० (२३३१४७६, https://gasca.ac.in/

जाहिरात – https://drive.google.com/file/d/154jW9CH-sU47jcFCuryJe7HfwNoxbrkH/view

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube