सफाई कामगार पुनर्वसन योजना

सफाई कामगार पुनर्वसन योजना

LetsUpp | Govt.Schemes
राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे (cleaners)व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ (National Sanitation Personnel Finance and Development Corporation), या महामंडळाची स्थापना केली असून, या योजनेत 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य (financial assistance) केले जाते. हे अर्थसहाय्य सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाकडून केले जात असून जिल्ह्याच्या ठिकाणी ही योजना महात्मा फुले मागासवर्गविकास महामंडळातर्फे (Mahatma Phule Backward Class Development Corporation) राबविली जाते.

योजनेच्या प्रमुख अटी :
• किमान शैक्षणिक पात्रता आवश्यकता नाही.
• वयोमर्यादा (वर्षे) 18 ते 45
• लिंग पुरूष / महिला
• कार्यक्षेत्र ग्रामीण /शहरी
• कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी) आवश्यकता नाही.
• कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी) आवश्यकता नाही.

आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणारे दोघे गजाआड; उद्या शेवगाव बंदची हाक

आवश्यक कागदपत्रे :
▪ विहित नमुन्यातील अर्ज
▪ पासपोर्ट फोटो
▪ उत्पन्नाचा दाखला
▪ गतवर्षीची गुणपत्रिका
▪ जातीचा दाखला
▪ निवडणूक ओळखपत्र / आधार कार्ड / पाणी पट्टी / वीज बिल / रेशन कार्ड / विवाह नोंदणी प्रमाणपत्र / पारपत्र / राष्ट्रीयकृत बँक पासबुक

लाभाचे स्वरूप असे : स्वच्छतेच्या कामाकरिता उपयोगात येणारे वाहन व इतर साहित्य निर्मितीकरिता विशेष बाब म्हणून 10 लाखांपर्यंत कर्ज 8 टक्के व्याजदराने दिले जाते. प्रकल्पाच्या संपूर्ण रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ व 20 टक्के रक्कम महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत देण्यात येते.
कमाल कर्जमर्यादा 5 लाख.
• बँकेचा सहभाग व व्याजदर नाही. स्वतःचा सहभाग 5 टक्के, यंत्रणेचा सहभाग व व्याजदर 95 टक्के व व्याजदर 4 टक्के व 6 टक्के प्रमाणे (अनुदान 10 हजार रुपये /-) तारण यंत्रणेच्या नियमानुसार• इ. एम. आय. यंत्रणेच्या नियमानुसार• परतफेडीची सुरूवात 3 महिन्यानंतर किंवा व्यवसायानुसार परतफेडीचा कालावधी 60 महिने, शेरा राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळच्या कर्जाची परतफेड वेळेत न केल्यास 2 टक्के दंडव्याज आकारण्यात येते. उमेदवाराचा स्वतःचा सहभाग 1 लाख प्रकल्प मर्यादेपर्यंत निरंक व त्यापुढे 5 टक्के असतो.

या ठिकाणी संपर्क साधावा :
▪ महात्मा फुले मागासवर्गविकास महामंडळ जिल्हा कार्यालय

📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube