विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र वापरासाठी अनुदान

विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र वापरासाठी अनुदान

LetsUpp l Govt. Schemes
उत्पादित वैरणीचा पुरेसा वापर व्हावा यासाठी सर्वसाधारण सर्व प्रवर्गासाठी (शेतकरी/पशुपालक/सहकारी दुध उत्पादक संस्थाचे सभासद) केंद्र पुरस्कृत योजना सुरु करण्यात आली आहे.

Love Jihad : महाराष्ट्रातही कडक कायदा लागू होणार, आमदार राम शिंदेंची माहिती…

योजनेसाठी अटी :
लाभार्थी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 5 किंवा त्यापेक्षा अधिक पशुधन असणे आवश्यक आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांने यापूर्वी या योजनेचा कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय संस्थेकडून लाभ घेतलेला नसावा.

लाभाचे स्वरूप :
– 5 ते 15 पशुधनाकरीता 1 अश्वशक्ती विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान – अनुदानाची अधिकतम मर्यादा रु.6000/- प्रति यंत्र.
– 16 ते 25 पशुधनाकरीता 2 अश्वशक्ती विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान – अनुदानाची अधिकतम मर्यादा रु.8000/- प्रति यंत्र.
– 25 किंवा 25 पेक्षा जास्त पशुधनाकरीता 3 अश्वशक्ती विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान – अनुदानाची अधिकतम मर्यादा रु.10,000/- प्रति यंत्र.

आवश्यक कागदपत्रे :
अर्ज करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे-
अ) संस्थेसाठी अशी कागदपत्रे सादर करावेत.
प्रस्ताव केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनूसार विहित नमुन्यामध इंग्रजीत सादर करावा.
संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत
विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याची यादी व त्यांच्या कडील पशुधनाबाबत पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र
संस्थेचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचा ठराव
संचालक मंडळाची यादी.
घटनेतील उद्देशाची प्रत.
मागील 3 वर्षाचे लेखापरिक्षण अहवाल
ब) वैयक्तिक लाभार्थीसाठी अशी कागदपत्रे सादर करावेत
विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा.
लाभार्थीकडे पशुधन असल्याबाबतचे नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र

संपर्क कार्यालयाचे नाव : आपल्या जिल्हयाचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube